महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सुशांतसिंह प्रकरण : रियानंतर सिद्धार्थ पिठाणीला ईडीकडून चौकशीसाठी समन्स - siddharth pithani summoned by ed

सुशांतने 2018 ते 2020 पर्यंत 3 कंपन्या उघडल्या होत्या. या कंपन्यांपैकी एका कंपनीवर रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती व आणि स्वत: सुशांत हे तिघे संचालक होते. तर, आणखी एका कंपनीवर शोविक व सुशांत हे दोघे संचालक म्हणून दाखविण्यात आले आहेत. तिसऱ्या कंपनीवर सुशांत, वरूण माथूर, सौरभ मिश्रा हे तिघे संचालक असून गुरुग्राम येथील कार्यालयाचा पत्ता दाखवण्यात आला आहे.

Sushant singh rajput's friend siddharth pithani was summoned by enforcement  directorate
सुशांतसिंह प्रकरण - रियानंतर, सिद्धार्थ पिठाणीला ईडीकडून चौकशीसाठी समन्स

By

Published : Aug 8, 2020, 10:58 AM IST

Updated : Aug 8, 2020, 11:19 AM IST

मुंबई -अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल केल्यानंतर सुशांतच्या कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारासंदर्भात ईडीकडून चौकशी केली जात आहे. या चौकशीदरम्यान आतापर्यंत ईडीने सुशांतचा चार्टर्ड अकाउंटंट, हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा व सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती यांची चौकशी केली आहे. शुक्रवारी रिया चक्रवर्ती हीची तब्बल 9 तास चौकशी केल्यानंतर शनिवारी सुशांतचा रूममेट सिद्धार्थ पिठाणी याचीसुद्धा ईडीकडून चौकशी केली जाणार आहे. सिद्धार्थ पिठाणीला ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत.

सिद्धार्थ पिठाणीला ईडीकडून चौकशीसाठी समन्स

सुशांतने 2018 ते 2020 पर्यंत 3 कंपन्या उघडल्या होत्या. या कंपन्यांपैकी एका कंपनीवर सुशांत, रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती हे तिघे संचालक होते. तर, आणखी एका कंपनीवर शोविक व सुशांत हे दोघे संचालक म्हणून दाखवण्यात आले आहेत. तिसऱ्या कंपनीवर सुशांत, वरूण माथूर, सौरभ मिश्रा हे तिघे संचालक असून गुरुग्राम येथील कार्यालयाचा पत्ता दाखवण्यात आला आहे.
सुशांतसिंह राजपूतच्या कंपन्या -

1) सुशांतसिंह याच्यासोबत रिया चक्रवर्ती व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती या दोघांनी 'फ्रंट इंडिया वर्ल्ड फाऊंडेशन ही कंपनी 6 जानेवारी 2020 मध्ये सुरू केली. यातील शेअर कॅपिटल 1 लाख रुपये तर पेड कॅपिटल 1 लाख रुपये होते. या कंपनीवर सुशांत आणि शोविक चक्रवर्ती हे दोघे संचालक होते. सोशल वर्क करण्याचा संदर्भात कंपनी काम करत होती.

  • या कंपनीचा कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन क्रमांक - U85300NP2020NPL335524
  • कंपनी रजिस्ट्रेशन क्रमांक - 335524
  • पत्ता - फ्लॅट नंबर 503, साई फॉर्च्युन प्लॉट 15, सेक्टर 8 उलवे नवी मुंबई.

2) सुशांतसिंहची उद्यम इनसे उद्यम प्रायव्हेट लिमिटेड ही 6 एप्रिल 2018 मध्ये सुरू करण्यात आली होती. यातील शेअर कॅपिटल 1 लाख रुपये तर पेड कॅपिटल 1 लाख रुपये होते. या कंपनीवर सुशांत. वरूण माथूर, सौरभ मिश्रा हे संचालक होते.

  • या कंपनीचा कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन क्रमांक - U930HR2018PTC073830
  • कंपनी रजिस्ट्रेशन क्रमांक - 73830
  • पत्ता - b-204 दि जुडा को-ऑपरेटीव जीएच 1 सेक्टर 56 गुरुग्राम.

3) विविद्रीग रिहालिटी प्रायवेट लिमिटेड ही कंपनी 12 सप्टेंबर 2019 रोजी सुरू करण्यात आली होती. या कंपनीचे शेअर कॅपिटल 1 लाख व पेड कॅपिटल 1 लाख होते. कॉम्प्यूटर मेंटनेंस आणि वेबसाईट संदर्भात मेंटेनस व प्रेझेंटेशचे काम ही कंपनी करत होती. कंपनी संचालक म्हणून सुशांत, शोविक चक्रवर्ती व रिया चक्रवर्ती यांची नावे आहेत.

  • या कंपनीचा कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन क्रमांक - U72900MH2019PTC330454
  • पत्ता - फ्लॅट नंबर 503, साई फॉर्च्युन प्लॉट 15, सेक्टर 8 उलवे नवी मुंबई.
Last Updated : Aug 8, 2020, 11:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details