महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सुशांतसिंह राजपूतच्या सीएची ईडीकडून चौकशी - Chartered Accountant Sandeep Sridhar

ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सीए श्रीधर हा बऱ्याच काळापासून सुशांतसिंह राजपूत याच्यासाठी सीए म्हणून काम करत होता. ईडीच्या अधिकाऱ्याने सुशांतसिंहच्या आर्थिक व्यवहाराबाबत सीए श्रीधरला प्रश्न विचारले आहेत.

संपादित
संपादित

By

Published : Aug 3, 2020, 7:51 PM IST

मुंबई - अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिग प्रकरणात तपास सुरू केला आहे. ईडीच्या पथकाने सुशांतसिंहचा सनदी लेखापरीक्षक (सीए) राहिलेल्या संदीप श्रीधर याच्या घरी जावून चौकशी केली आहे.

ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सीए श्रीधर हा बऱ्याच काळापासून सुशांतसिंह राजपूत याच्यासाठी सीए म्हणून काम करत होता. ईडीच्या अधिकाऱ्याने सुशांतसिंहच्या आर्थिक व्यवहाराबाबत सीए श्रीधरला प्रश्न विचारले आहेत. ईडीने सुशांतसिंहची मैैत्रिण रिया चक्रवर्तीचा सीए रितेश शाह याचीही मंगळवारी मुंबईमधील कार्यालयात चौकशी केली आहे.

ईडीने रिया आणि तिच्या कुटुंबाविरोधात शुक्रवारी मनी लाँड्रिग प्रकरणात गुन्हा नोंदविला आहे. सुशांतसिंहचे 15 कोटी रुपये चक्रवर्ती कुटुबीयांनी त्यांच्या खात्यावर बेकायदेशीरपणे वळविल्याचा ईडीला संशय आहे. सुशांतसिंहचे वडील. के. के. सिंह यांनी बिहार पोलिसात रियाविरोधात तक्रार दिली. त्यानंतर ईडीने बिहार पोलिसांच्या आरोपपत्रावरून रिया आणि तिच्या कुटुंबाविरोधात कारवाई सुरू केली आहे. येत्या काळात ईडीकडून आणखी काही लोकांना नोटीस पाठवून त्यांची चौकशी केली जाणार आहे.

ईडीने सुशांतसिंहच्या मालकीच्या दोन कंपन्यांबाबत सविस्तर माहिती मागविली आहे. तसेच रियाच्या कुटुंबातील व्यक्तींच्या बँक खात्याविषयी ईडीकडून तपास केला जात आहे. विविड्रेज रिअल्टीटिक्स कंपनीमध्ये रिया ही संचालक आणि फ्रंट इंडिया फॉर वर्ल्डमध्ये तिचा भाऊ शौविक हा संचालक होता. या कंपन्यांच्या व्यवहाराबाबतही ईडीकडून तपास केला जात आहे.

सुशांतसिंहच्या वडिलांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे रियावर आरोप केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details