मुंबई -प्रजा फाऊंडेशन नेहमीच लोकप्रतिनिधींच्या कामांचा लेखाजोखा आपल्या प्रगती पुस्तकातून सर्वांसमोर मांडत असते. प्रजा फाऊंडेशन ( Praja Foundation ) यांनी यावेळी मुंबई आणि उपनगर मधील 31 आमदारांच्या कामांचा लेखाजोखा ( MLAs Work Accounting ) समोर आणला आहे. प्रजा फाऊंडेशनने आमदारांचा गेल्या दोन वर्षांचा कामाचा सर्वे ( two years work survey )केला असून, यामध्ये कोणत्या आमदारांनी किती दिवस आपल्या कर्तव्याला न्याय दिला. तसेच कोणते आमदार आपलं काम योग्यरीत्या करू शकले नाही. याबाबतचा सर्वे प्रजा फाऊंडेशनने केला आहे. आमदारांच्या केलेल्या सर्वेनुसार काँग्रेस पक्षाचे मुंबईतील आमदार अनिल पटेल हे सर्वात अव्वल स्थानी आहेत. 81. 43 टक्के असे सर्वात चांगलं काम आमदार अमिन पटेल यांनी केले असल्याचा दावा प्रजा फाउंडेशन ने आपल्या सर्वेक्षणानुसार केला आहे.
काँग्रेसचे आमदार अनिल पटेल -काँग्रेसचे आमदार अनिल पटेल ( Congress MLA Anil Patel ) यांच्या पाठोपाठ भारतीय जनता पक्षाचे आमदार पराग अळवणी ( BJP MLA Parag Alwani ) यांनी 79.96% चांगले काम केले आहे. तर तिसर्या क्रमांकावर शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू ( Shiv Sena MLA Sunil Prabhu ) असून त्यांनी 77. 19% काम केले आहे. मात्र प्रजा फाऊंडेशन कडून हा सर्वे करत असताना मुंबईतील या आमदारांकडे मंत्रीपदे होती. त्यांच्या कामांचा सर्वे करण्यात आलेला नाही. त्यामुळे माजी मंत्री आदित्य ठाकरे, माजी मंत्री वर्षा गायकवाड, माजी मंत्री अस्लम शेख, माजी मंत्री नवाब मलिक. आणि शिवसेनेचे आमदार रमेश लटके (मृत्यू ) यांच्या कामाचा आढावा या सर्वेत करण्यात आलेला नाही.