मुंबई -शीना बोरा हत्याकांडातील ( Sheena Bora Murder Case ) मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीने ( Indrani Mukherjee ) सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान न्यायालयाकडून प्रतिवाद्यांना नोटीस जारी करण्यात आल्या असून इंद्राणी मुखर्जी यांच्या जामीन अर्जावर उत्तर द्यायला सांगितले आहे. न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली आणि त्या संदर्भात प्रतिवाद्यांना नोटीस बजावली. वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी इंद्राणी मुखर्जीसाठी कोर्टात युक्तिवाद केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नोटीस बजावली आहे.
'सीबीआय आणि राज्य सरकारला नोटीस' -
शीना बोरा हत्याकांड यातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी गेल्या 6.5 वर्षांपासून तुरुंगात असल्याची माहिती रोहतगी यांनी खंडपीठाला दिली. रोहतगी यांनी युक्तिवाद केला की सद्यस्थिती लक्षात घेता ज्या पद्धतीने खटला सुरू आहे. त्या संभाव्यतेनुसार येत्या 10 वर्षांत खटला समाप्त होणार नाही. न्यायमुर्ती एल. नागेश्वर राव आणि न्यायमुर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठाने इंद्रायणी मुखर्जीला जामीन नाकारला आहे. याबरोबरच मुंबई उच्च न्यायालयाच्या 16 नोव्हेंबर 2021च्या आदेशाला आव्हान देत त्यांच्या याचिकेवर सीबीआय आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
स्वत: ची मुलीच्या हत्येचा आहे आरोप -
न्यायमुर्ती एल. नागेश्वर राव आणि न्यायमुर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठाने पाठवलेल्या नोटीसीचे दोन आठवड्यात उत्तर द्यावे, असे आदेश दिले आहेत. वकील मुकुल रोहतगी यांनी इंद्रायणी मुखर्जी हिजी बाजू कोर्टात मांडली आहे. ऑगस्ट 2015 मध्ये इंद्रायणी मुखर्जी हिला अटक करण्यात आली असून सध्या ती मुंबई येथील भायखळा महिला कारागृहात आहे. स्वत: ची मुलगी शीना बोरा हिची हत्या केल्याचा आरोप इंद्रायणी मुखर्जीवर आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयात या प्रकरणावर खटला सुरू आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयानेही इंद्रायणीला जामीन नाकारला आहे.