मुंबई -शिवसेना पक्षातील अंतर्गत वादाचे प्रकरण ( Supreme court hearing on Shivsena matter ) सध्या न्यायप्रविष्ट आहे. सलग दोन दिवसांनंतर सोमवारी पुन्हा सुनावणी होणार होती. या सुनावणीला आता तारीख पे तारीख ( Shivsena court case status ) देण्यात आली आहे. त्यामुळे, सोमवारी ८ ऑगस्टला होणारी सुनावणी बुधवारी १२ ऑगस्टला होण्याची शक्यता आहे. यापूर्वी ३ ऑगस्टची सुनावणी ४ ऑगस्टला ( Shivsena and Supreme court ) झाली होती.
हेही वाचा -Varsha Raut ED Inquiry : पत्राचाळ प्रकरणी वर्षा राऊतांची ईडीकडून 9 तास चौकशी
एकनाथ शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या ( Shivsena news ) मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. हे सरकार बेकादेशीर पणे स्थापन झाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे. तर आपणच शिवसेना असून, आम्ही शिवसेना सोडली नसल्याचा दावा शिंदे गटाकड़ून करण्यात येत आहे. या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान युक्तिवादही झाले. ४ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाने देखील आपली बाजू मांडली. दरम्यान, शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत सध्या कुठलाही निर्णय घेऊ नका, असे निर्देश सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा यांनी निवडणूक आयोगाला दिले होते. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होत आहे.