सिंधुदुर्ग - जिल्हा बँक निवडणूक नितेश राणे ( Nitesh Rane ) यांना चांगलीच भोवली आहे. संतोष परब शिवसैनिक हल्ला ( Santosh Parab Attack Case ) प्रकरणी 18 डिसेंबर रोजी हल्ला झाला होता. या प्रकरणामध्ये नितेश राणे ( Bjp Mla Nitesh Rane ) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली असून, नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास 10 दिवसांची मुदत दिली आहे.
Supreme Court On Nitesh Rane : नितेश राणेंना सर्वोच्च न्यायालयाचा झटका; शरण येण्यास दहा दिवसांचा कालावधी - Supreme Court On Nitesh Rane
शिवसैनिक संतोष परब हल्ला ( Santosh Parab Attack Case ) प्रकरणात नितेश राणे (Nitesh Rane) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्यास 10 दिवसांची मुदत दिली आहे.
जामीनाचा मार्ग नितेश राणे यांच्यासाठी बंद
नितेश राणे हे कणकवली पोलिस ठाण्यांमध्ये तीन वेळा चौकशीला सामोरे गेले होते. संतोष परब हल्ला प्रकरणात पोलिसांना लागेल ती मदत करण्यास तयार आहे असेही नितेश राणे यांनी म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर 10 दिवसांत सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात हजर राहण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हजर राहावे लागणार आहे. मात्र, अटकपूर्व जामीनाचा मार्ग नितेश राणे यांच्यासाठी बंद झाला आहे.
काय आहे प्रकरण ?
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे समर्थक करंजे माजी सरपंच संतोष परब ( Attack on Santosh Parab ) यांच्यावर 18 डिसेंबर 2021 रोजी अज्ञात इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केल्याने परब जखमी झाले होते. संतोष परब यांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला राजकीय वादातून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जिल्हा बँक इलेक्शन सुरू असतानाच झालेल्या या हल्ल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. संतोष परब हे मोटरसायकल वरून कनकनगर येथे जात असताना मागून येणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या इनोव्हा कारने परब यांच्या मोटरसायकलला डॉ. नागवेकर यांच्या एम. आर. आय. सेंटर नजीक मागून धडक दिली. धडकेनंतर परब रस्त्यावर पडल्यानंतर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी परब यांच्यावर चाकू सदृश्य टोकदार हत्याराने छातीवर वार केले.
हेही वाचा -Santosh Parab Attack Case : अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणेंची सर्वोच्च न्यायालयात धाव