मुंबई :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर या आठवड्यात सुनावणी (hearing on Anil Deshmukhs bail application) घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला निर्देश दिले (Supreme Court directs urgent hearing) आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आठवड्याभरात सुनावणी घेऊन त्यांच्या जामीन अर्जावर तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाला सर्वोच्च न्यायालयाने आज दिले आहे. अनिल देशमुख यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मागील वर्षी ईडीने अटक केली होती. सध्या अनिल देशमुख न्यायालयीन कोठडी आहे.
अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावरील सुनावणी तातडीनं पूर्ण करण्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाला निर्देश देण्यात आले आहेत. या आठवड्यात सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाला (Mumbai High court) ही सुनावणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते, मात्र काही कारणांनी वारंवार ही सुनावणी एका न्यायमूर्तींकडून दुसऱ्याकडे गेल्यानं सुनावणी पूर्णच होऊ शकली (Supreme Court directs urgent hearing) नाही.
अनिल देशमुख 100 कोटींचा भ्रष्टाचार -अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय न दिल्याने आणि ती प्रलंबित ठेवल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. आठ महिने जामीन अर्ज प्रलंबित ठेवणे जामीनाच्या नियमानुसार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. अनिल देशमुख यांच्या वतीने मुंबई सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावर अद्यापही सुनावणी होऊ शकली नाही. अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज अनेक न्यायाधीशांच्या खंडपीठांसमोर गेला असता 'नॉट बी फॉर मी', असे न्यायालयाकडून सांगण्यात आले होते.
नोव्हेंबर 2021 मध्ये ईडीकडून अटक -अनिल देशमुख सध्या 100 कोटींच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात आहेत. न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठाने सांगितले की, देशमुख यांची जामीन याचिका 21 मार्चपासून उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. कोणत्याही व्यक्तीने जामिनासाठी अर्ज केला तर, अशी अपेक्षा आहे की -त्याची याचिका लवकरात लवकर निकाली काढली जाईल. जामीन अर्ज प्रलंबित ठेवणे हे कलम 21 अंतर्गत जगण्याच्या अधिकाराशी सुसंगत नाही. या आठवड्यात या अर्जावर सुनावणी घेण्यात यावी. त्यावर तातडीने निर्णय घ्या, असे खंडपीठाने (Anil Deshmukhs bail application) सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, त्यांनी या प्रकरणाच्या गुणवत्तेवर कोणतेही मत व्यक्त केले नाही. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन. जे. जमादार देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करत आहेत. देशमुख यांना नोव्हेंबर 2021 मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.