मुंबई -आज केंद्रीय आरोग्य विभागाकडून राज्यासाठी नऊ लाख लसींचा साठा देण्यात आला, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. केंद्रीय आरोग्य विभागाकडून नऊ लाख लस उपलब्ध झाल्यामुळे पुढील दीड ते दोन दिवस राज्यभरात लसीकरण सुरळीत होईल, असे आरोग्य मंत्र्यांकडून सांगण्यात आले. मात्र, दररोज 10 लाख नागरिकांचे लसीकरण करण्याची क्षमता राज्य सरकारची असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
माहिती देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे हेही वाचा -RTE Admission : विद्यार्थी-पालकांना दिलासा; आरटीई प्रवेशासाठी आता 9 जुलैपर्यंत मुदतवाढ
केंद्र सरकारकडून दररोज १० लाख लसींचा साठा उपलब्ध झाल्यास राज्यातील नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण केले जाईल, असा विश्वासही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला.
गेल्या दोन दिवसापांसून लसीचा तुटवडा
गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात लसीच्या साठ्याचा तुटवडा जाणवत आहे. यामध्ये खास करून कल्याण-डोंबिवली, रत्नागिरी, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर या भागांमध्ये लस उपलब्ध नव्हती. त्यामुळे, या भागांमध्ये लसीकरण बंद करण्यात आले होते. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट येण्याआधी राज्यातील 70 टक्के लसीकरण पूर्ण झाले पाहिजे, असा मानस राज्य सरकारचा आहे. मात्र, अपुऱ्या लसीच्या पुरवठ्यामुळे अनेक वेळा लसीकरण केंद्र बंद पडत असल्याचे चित्रही पाहायला मिळते.
आज मुंबईत बंदे होते लसीकरण
मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र, लस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून लसीचा साठा येत नसल्याने वेळोवेळी लसीकरण बंद ठेवावे लागले. आज (1 जुलै) पुन्हा एकदा मुंबईमध्ये लसीचा साठा नसल्याने लसीकरण बंद ठेवण्यात आले. लसीचा साठा आल्यावर लसीकरण पुन्हा सुरू केले जाईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
हेही वाचा -Mumbai Corona Vaccination : लसीचा तुटवडा, आज मुंबईत लसीकरण बंद