मुंबई :पीएनबी मनी लाँड्रिंग प्रकरणात (PNB Money Laundering Case) फरार ज्वेलरी व्यावसायिक मेहुल चोक्सी, त्याची पत्नी प्रिती चोक्सी आणि इतरांविरुद्ध फिर्यादी तक्रार आरोप पत्र दाखल करण्यात आले आहे. ईडीने दावा केला आहे की, मेहुल चोक्सी आणि त्यांची पत्नी प्रीती चोक्सी 2017 पासून अँटिग्वामध्ये पतीसोबत लपून बसली होती.
मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल आरोप पत्र दाखल : चोक्सी, यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर सहा जणांविरुद्ध मुंबईतील विशेष न्यायालयात दाखल करण्यात आलेले हे दुसरे पुरवणी आरोपपत्र आहे. 13,500 कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक फसवणूक प्रकरणात सीबीआय आणि ईडी अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) चोक्सी यांचा मिळवण्यासाठी प्रयत्नशिल आहेत. चोक्सी याला 26 मे रोजी डॉमिनिका येथे पकडण्यात आले आहे. चोक्सीच्या वकिलांनी दाखल केलेल्या हॅबियस कॉर्पसच्या सुनावणीनंतर डोमिनिकन कोर्टाने त्यांच्या हद्दपारीवर प्रतिबंध केला होता.