मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७९ वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चाहत्यांनी त्यांना जलसा बंगल्याबाहेर केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ यांच्या चाहत्यांनी त्यांच्या चित्रपटांविषयी सांगितले, अमिताभ बच्चन यांच्या गाण्यांबद्दल सांगितले, अनेक चाहत्यांनी अमिताभ बच्चन यांचे संवादही यावेळी कथन केले.
महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७९ वा वाढदिवस ते रात्री 12:00 वाजता जलसामध्ये येतात
पुण्यातून अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबईत आलेल्या सत्यवान गीते नावाच्या रिक्षाचालकाने त्यांच्या संपूर्ण रिक्षावर अमिताभ बच्चन यांचे पोस्टर लावून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. एवढेच नाही तर, रिक्षात लाऊडस्पीकर लावून आणि त्यांच्या घराच्या बाहेर जलसा केक कापून गाणी वाजवताना दिसले. सत्यवान गीते यांनी सांगितले की, ते अमिताभ बच्चन यांचे मोठे चाहते आहेत, दरवर्षी अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी ते रात्री 12:00 वाजता जलसामध्ये येतात आणि केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करतात.
महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ७९ वा वाढदिवस, चाहत्यांनी जलसा बंगल्याबाहेर कापला केक हेही वाचा -मोदीजी जगभर फिरतात, मात्र शेतकऱ्यांसाठी दिल्ली बॉर्डरपर्यंतही जात नाहीत; प्रियंका वाराणसीत गरजल्या