मुंबई: Sanjay Raut: मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना नेते संजय राऊत Shiv Sena leader Sanjay Raut यांनी 8 ऑगस्ट रोजी सत्र न्यायालयात Session Court आपल्या आईला एक पत्र लिहिले. जे बुधवारी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आले आहे. संजय राऊत यांनी आपल्या आईला पत्र लिहून म्हटले आहे की, आज राज्य षड्यंत्रकर्त्यांच्या हाती गेले आहे. त्यांना शिवसेनेचे अस्तित्व आणि महाराष्ट्राची शान चिरडायची आहे. संजय राऊत यांच हे पत्र सध्या व्हायरल letter viral होत असून यावर आता संजय राऊत यांचे बंधू व शिवसेनेचे नेते आमदार सुनील राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
म्हणून ते भावनिक पत्रयावेळी बोलताना आमदार सुनील राऊत म्हणाले की, शिवसेना नेते खासदार आणि आमचे बंधू संजय राऊत हे दौऱ्याला असताना त्यांची आणि आईची भेट व्हायची नाही. कारण, जास्तीत जास्त पाच ते सहा दिवस दौऱ्यावर असायचे. त्या दौऱ्याच्या काळात सुद्धा त्यांचं सतत आईशी फोनवर बोलणं व्हायचं. पण आत्ता ते 3 महिने झाले, पण त्यांची आईशी भेट झाली नाही. की फोनवर बोलणं झालेलं नाही. माझी आई 84 वर्षांची आहे. त्यामुळे ती कोर्टाच्या प्रत्येक सुनावणीला येऊ शकत नाही. असे आमदार सुनील राऊत यांनी म्हटले आहे.