मुंबई -पत्राचाळ घोट्याप्रकरणी काल शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत ( Sunil Raut on Sanjay Raut arrest by ED ) यांच्या घरी ईडीने छापा टाकला होता. सकाळी 7 ते सध्याकाळी 4 पर्यंत संजय राऊत यांची त्यांच्या घरी चौकशी ( Sanjay Raut arrest by ED ) झाल्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आले होते. तेथे चौकशी नंतर त्यांना ईडीने ( Patra chawl scam and sanjay raut ) अटक केल्याची माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली. भाजप संजय राऊत यांना घाबरत असून म्हणून त्यांची अटक करण्यात आल्याचे सुनील राऊत म्हणाले. तसेच, आज न्यायालयासमोर संजय राऊत यांना हजर करण्यात ( ED action on sanjay raut regarding patra chawl scam ) येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा -Gold Silver Rates : सोने स्थिर, तर चांदी झाली 400 रुपयांनी महाग; जाणून घ्या सोने-चांदीचे दर
भाजप संजय राऊत यांना घाबरते -संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे. भाजप संजय राऊत यांना घाबरते, म्हणून त्यांची अटक करण्यात आली. संजय राऊत यांच्या अटकेप्रकरणी आम्हाला कुठलीही कागदपत्रे देण्यात आलेली नाही. त्यांच्याविरुद्ध कट रचण्यात आला आहे, असे सुनील राऊत म्हणाले. तसेच, आज सकाळी 11.30 वाजता संजय राऊत यांना न्यायालयात हजर केले जाईल, असा दावा सुनील राऊत यांनी काल केला.
संजय राऊत यांना ईडीकडून अटक -पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांची त्यांच्या घरी काल सकाळी 7 ते सध्याकाळी 4 वाजेपर्यंत चौकशी झाली. त्यानंतर ईडीने त्यांना कार्यालयात नेले व तेथे चौकशी केली. त्यानंतर साडेअकराच्या सुमारास राऊत यांना अटक करण्यात आल्याचे ईडीच्या सुत्रांनी सांगितले. संजय राऊत यांच्या घरी ईडीकडून तपास सुरू असताना मोठ्या प्रमाणात शिवसैनिक घराबाहेर जमले होते. यावेळी गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. चौकशीदरम्यान संजय राऊत यांनी खिडकीतून समर्थकांकडे हातवारे देखील केले होते.
पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरण नेमकं काय आहे? -पत्रा चाळ परिसरातील बैठ्या घरांमध्ये राहात असलेल्या 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. ही घरे भाडेतत्त्वावर असल्यामुळे त्यासाठी म्हाडाची परवानगी आवश्यक होती. म्हाडानेही त्यास तयारी दाखवत विकासक आणि सोसायटीसमवेत करारनामा केला. याअंतर्गत मूळ रहिवाशांचे मोफत पुनर्वसन केल्यानंतर उपलब्ध होणाऱ्या बांधकामामध्ये विकासक आणि म्हाडामध्ये समान हिस्सा राहणार होता. मात्र म्हाडा अधिकाऱ्यांनी जमिनीची मोजणी कमी केल्यामुळे विकासकाला 414 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा आक्षेप निवासी लेखापरीक्षण विभागाने घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी म्हाडावर जोरदार ताशेरे ओढले. त्यानंतर त्यास जबाबदार असलेल्या कार्यकारी अभियंत्यांना निलंबित करण्यात आले. एका महिन्याच्या नोटिशीची मुदत संपल्यावर विकासकाची उचलबांगडी करण्यात आली. मात्र विकासकाला पुनर्वसनातील सदनिका बांधण्याआधीच विक्रीची परवानगी देणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यावर काहीही कारवाई केली नाही. मात्र त्याचा फटका सामान्य रहिवाशांना बसला आहे. गेली पाच वर्षे भाडे नाही आणि हक्काचे घरही गमावावे लागले आहे.
आक्षेप असणारा जमीन व्यवहार काय? -पत्रा चाळ परिसराचे मूळ क्षेत्रफळ 1,93,599 चौरस मीटर विकास करारनाम्यात 1,65,805 चौरस मीटर म्हणजे 27,794 चौरस मीटर कमी दाखविण्यात आले. म्हाडाच्या वाटय़ाला येणाऱ्या 50 टक्के म्हणजे 13,897 चौरस मीटर जागेचा विकासकाला फायदा करून दिल्याप्रकरणी कार्यकारी अभियंता एस. डी. महाजन निलंबित झाले आहेत.