महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sunil Raut : 'संपूर्ण कुटुंबाला ईडीने अटक केली, तरी घाबरणार नाही; शिवसेना सोडणार नाही' - सुनील राऊत वर्षा राऊत ईडी चौकशी मराठी बातमी

आमच्या संपूर्ण कुटुंबाला जरी अटक केली, तरी शिवसेना सोडणार नाही, असा इशारा आमदार सुनील राऊत यांनी दिला ( sunil raut on ed ) आहे.

sanjay raut sunil raut varsha raut
sanjay raut sunil raut varsha raut

By

Published : Aug 7, 2022, 5:43 PM IST

Updated : Aug 7, 2022, 6:33 PM IST

मुंबई -भाजप ईडीच्या माध्यमातून काय करतेय, हे संपूर्ण राज्याला माहीत आहे. संजय राऊत यांना अटक झाली ( ed arrested sanjay raut ) आहे. त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची देखील चौकशी ईडी करत ( varsha raut ed inquiry ) आहे. उद्या आपल्याला देखील चौकशीसाठी बोलावले जाऊ शकतं. मात्र, आमच्या संपूर्ण कुटुंबाला जरी अटक केली, तरी शिवसेना सोडणार नाही, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी दिला ( sunil raut on ed )आहे. ईडी कार्यालयाच्या परिसरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

सुनील राऊत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

सुनील राऊत म्हणाले की, संजय राऊत हे बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. गेली तीस ते बत्तीस वर्ष शिवसेनेसाठी ते काम करतात. त्यामुळे संजय राऊत हे भ्रष्टाचार करू शकत नाहीत. केवळ भाजपच्या विरोधात घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांच्यावर ही कारवाई केली असल्याचा आरोपही सुनील राऊत यांनी केला.

'महिनाभरात बंडखोर आमदार अस्वस्थ' - शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी करत पक्षाची गद्दारी केली. मात्र, या सर्व 40 आमदारांना शिवसैनिकांचा तळतळाट लागेल. शिवसेना सोडून जाणाऱ्यांची काय परिस्थिती होते हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे शिवसेना सोडून जाणाऱ्या आमदारांना एक महिन्यातच अस्वस्थ वाटतंय. म्हणूनच मैत्री दिनाच्या निमित्ताने बंडखोर आमदारांकडून एकत्र येण्याचे आवाहन केले जातेय. पश्चाताप होत असेल तर बंडखोर आमदार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क करावा, असं आवाहनही सुनील राऊत यांनी बंडखोर आमदारांना केल आहे.

'दिपक केसरकरांमध्ये अचानक तत्परता कशी?' - दिपक केसरकर यांचा मागचा इतिहास पाहिला तर, त्यांच्यामध्ये कधीही तत्परता पाहायला मिळाली नाही. मात्र, आता अचानक दीपक केसरकरांमध्ये तत्परता पाहायला मिळतेय. तसेच शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत बंडखोर आमदार एकतर अपात्र ठरतील किंवा त्यांना आपला वेगळा गट स्थापन करावा लागेल, असं कायदेतज्ञ मत व्यक्त करत असल्याचे देखील सुनील राऊत यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा -MNS Vs Governor Koshyari : 'कोश्यारींनी पुन्हा आपल्या बुद्धिमत्तेची कुवत...'; राज्यपालांच्या 'त्या' वक्तव्यावरुन मनसेचा हल्लाबोल

Last Updated : Aug 7, 2022, 6:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details