मुंबई:हार्बर रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे रेल्वे स्थानका दरम्यान रविवारी सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी मुंबई/ वडाळा रोड स्थानकातून सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 पर्यत वाशी/बेलापूर/पनवेलकरिता सुटणाऱ्या आणि सीएसएमटी मुंबई येथून सकाळी 10.48 ते सायंकाळी 4.43 वाजेपर्यंत वांद्रे /गोरेगाव करिता सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत. पनवेल/ बेलापूर / वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 पर्यंत सीएसएमटी मुंबईसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/ वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13पर्यंत सीएसएमटी मुंबईसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. विशेष म्हणजे या ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल सेवा चालविण्यात येणार आहे.
Mega block on Railway : हार्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
उपनगरीय रेल्वे मार्गावर (Suburban railway line) रेल्वे रुळाची दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी मध्य रेल्वे मार्गावर ( the Central Railway) रविवारी 20 फेब्रुवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक (Mega block) हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते भाईंदर अप डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
रविवारी मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वे मार्गावरही मेगाब्लॉक
रेल्वे रूळ सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते भाईंदर अप- डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. हा मेगाब्लॉक शनिवारी- रविवारी मध्य रात्री 11.30 ते पहाटे 4.30 वाजेपर्यंत असणार आहे या ब्लॉक कालावधीत काही लोकल उशिराने धावणार आहेत तर रविवारी पश्चिम रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक नसणार आहे.