महाराष्ट्र

maharashtra

मध्य रेल्वेवर रविवारी मेगा ब्लॉक

By

Published : Oct 23, 2020, 8:37 PM IST

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी 25 ऑक्टोबर रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी उपनगरी भागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

train
मध्य रेल्वे

मुंबई -मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रविवारी 25 ऑक्टोबर रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी उपनगरी भागांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नसल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान अप व डाउन धीम्या मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत हा ब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 9.30 ते 2.56 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील.

हेही वाचा -नियमबाह्य शुल्क आकारणाऱ्या खासगी शाळांवर कडक पाऊल उचलण्याचे बच्चू कडूंचे निर्देश

भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला येथे थांबून पुढे विद्याविहार येथे धिम्या मार्गांवर वळविण्यात येतील. घाटकोपर येथून सकाळी 9.38 ते दुपारी 2.48 पर्यंत सुटणाऱ्या जलद मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा येथे थांबतील.धिम्या मार्गांवरील सेवा मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार येथे उपलब्ध होणार नाहीत. या स्थानकांच्या प्रवाशांना परळ, दादर, कुर्ला आणि घाटकोपर स्थानकांमधून जाण्याची परवानगी राहिल.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत येणाऱ्या/जाणाऱ्या सर्व धिम्या लोकल सेवा ब्लॉकच्या कालावधीत वेळापत्रकापेक्षा 10 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

पनवेल-वाशी अप व डाउन मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 या वेळेत ब्लॉक असेल.पनवेल / बेलापूर येथून सकाळी 10.33 ते दुपारी 4.01 वाजताच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणारी हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून डाउन हार्बर मार्गावर बेलापूर, पनवेल येथून सकाळी 9.44 ते दुपारी 3.16 वाजता दरम्यान सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेलहून दुपारी 2.24 वाजता ठाणेकडे जाणारी व ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे येथून दुपारी 1.24 वाजता पनवेलला जाणारी सेवा बंद राहील.तथापि, ब्लॉक काळात हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-वाशी विभाग आणि ट्रान्स- हार्बर मार्गावर ठाणे-वाशी विभागांत विशेष गाड्या धावतील.

ABOUT THE AUTHOR

...view details