मेष :सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशामुळे आपणास आर्थिक क्षेत्रात लाभ होईल. आपण आपल्या जबाबदाऱ्या पार पाडू शकाल. कार्यक्षेत्री आपणास लाभ होईल.
उपाय : सूर्यास रोज सकाळी कुंकू मिश्रित पाण्याने अर्घ्य द्यावा.
वृषभ :सूर्य मकरेत आल्यामुळे आपली प्रकृती उत्तम राहील. आपणास नशिबाची साथ मिळेल. कोणतेही काम करण्यापूर्वी मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे.
उपाय : रोज गाईस गुळ खावयास द्यावा.
मिथुन :सूर्य मकर राशीतून गोचरीने भ्रमण करत असताना आपणास वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल. बाहेरील पदार्थ खाऊ नये. कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल.
उपाय :रोज गायत्री चालिसाचे पठण करावे.
कर्क : सूर्य मकर राशीस आल्यामुळे वैवाहिक जोडीदाराशी किंवा व्यावसायिक भागीदाराशी आपले मतभेद होण्याची संभावना आहे. पोटाचे विकार संभवतात. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पैसा खर्च करावा लागेल.
उपाय : सूर्याशी संबंधित वस्तू दान कराव्यात.
सिंह : सूर्य मकर राशीस आल्यामुळे आपले शत्रू कमकुवत होतील. आपणास जर नोकरीत बदल करावयाचा असेल तर त्यासाठी आपण प्रयत्न करू शकाल. आपल्या प्राप्तीत कपात तर खर्चात वाढ होऊ शकते.
उपाय : रोज सूर्याच्या एका मंत्राचा जप करावा.
कन्या : सूर्याचे मकर राशीतून गोचरीने भ्रमण असता घरात एखादे मंगल कार्य होण्याची संभावना आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. परंतु, मुलांशी संबंधित कोणत्याही कामात आपणास त्रास होऊ शकतो.
उपाय : रोज आदित्यहृदय स्तोत्राचे पठण करावे.