मुंबई -राज्यात मागील काळात पडलेला दुष्काळ आणि अनेक कारखाने अडचणीत सापडले असल्याने साखर उत्पादन क्षेत्र हे मोठ्या विपरित परिस्थितीतून जात आहे, त्याला वेळीच सावरले नाही तर त्याच्यावरील संकट अधिक गडद होईल, असे मत राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज मुंबईत व्यक्त केले.
अंधेरी पूर्व येथील 'आयटीसी मराठा' या पंचतारांकित हॉटेलमध्ये मागील दोन दिवसांपासून राष्ट्रीय साखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या समारोपाच्या भाषणात वळसे-पाटील यांनी राज्यातील साखर उत्पादन क्षेत्राला अधिक सावरण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
'साखर उत्पादन क्षेत्र मोठ्या विपरित परिस्थितीत, त्याला सावरण्याची गरज' राज्यात साखर उत्पादन क्षेत्रात अध्या मोठं संकट समोर आहे. मागील काळात उसाचे उत्पादन खूप जास्त झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळाला नाही. योग्य हमी भाव न मिळाल्यामुळे शेतकरी अडचणीत राहिला. मात्र साखर उत्पादन क्षेत्रात आता अधिकची साखर जमा असल्याने त्यांना त्यासाठी एक निर्यातीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकारने या निर्यातीसाठी अनुदान दिलेले असल्याने मी त्यांचेही धन्यवाद देतो. या क्षेत्रात जेव्हा जेव्हा संकट आले, तेव्हा तेव्हा त्यातून मार्ग काढला आहे. भविष्यातही असे संकट उभे राहू नये यासाठी प्रयत्न आमचे सुरू राहतील मात्र, यावर योग्य मार्ग काढणे आवश्यक आहे, नाहीतर या क्षेत्रात मोठे संकट उभे राहील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : 'सरकार कोणाचंही असो त्याच्याकडे पैसे नसतात, पण माझ्या खिशात ४ लाख कोटी रुपये आहेत'