मुंबई- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील गौरव प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी पुढे येत आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांमध्ये संबंधित विषयावरून खडाजंगी झाली. या खडाजंगीचे पडसाद बैठकीत उमटल्याने त्यावर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि भाजपचे नेते मुनगंटीवार यांनी माध्यमांसमोर येऊन खुलासा केला.
अर्थसंल्पीय अधिवेशनत 24 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनात पार पडली. या बैठकीत सुरुवातीला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसीच्या जनगणनेचा प्रस्ताव आणण्याची सूचना केली. तर लगेचच माजी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा गौरव प्रस्ताव दोन्ही सभागृहात आणून तो एकमुखाने मंजूर करण्याची मागणी लावून धरली.