मुंबई - शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीबद्दल अर्थमंत्रीसुधीर मुनगंटीवार यांना विचारले असता, नव्या इंटलीजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टम या प्रणालीमुळे मुंबईची वाहतूक कोंडी सुटेल, असे सांगितले.
मुंबईची वाहतूक कोंडी लवकरच सुटणार - सुधीर मुनगंटीवार
इंटलीजंट ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टम या प्रणालीमुळे मुंबईची वाहतूक कोंडी सुटणार असल्याचा विश्वास वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
मुंबईची वाहतुक कोंडी सुटणार - सुधीर मुनगंटीवार
मुंबई शहरात सध्या ट्रॅफिकचा मोठा प्रश्न आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्ही व्यर्थ जातात. मुंबईत कोस्टल, मेट्रोची काम सुरू आहेत. त्यामुळे इंटलीजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सीस्टम ही प्रणाली वापरली जाणार आहे. यामुळे दिवसभराच्या ट्रॅफिकचा अंदाज घेऊन सिग्नल चालवले जातील. जगातील सर्व प्रगत देशात ट्रॅफिक कंट्रोलसाठी ही सिस्टम वापरली जाते. या सिस्टममुळे मुंबईच्या ट्रॅफिकची समस्या सुटण्यास मदत होईल असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.