मुंबई - विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत व्हीप लागत नाही, असा दावा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दावा केला आहे. ११ वाजता अधिवेशनाची सुरुवात होईल, मुख्यमंत्री ( CM ), उपमुख्यमंत्री यांचा परिचय होईल. राहुल नार्वेकर यांचा प्रस्ताव सभागृहाचा समोर येईल. आवाजी मतदानाने ही प्रक्रिया होईल. जर कोणी आपती घेतली तर वयक्तिक मत घेतली जातील. व अध्यक्षाची निवड होईल ,असे त्यांनी सांगितले.
शिवसेना भाजप सरकार ( Shiv Sena BJP government ) स्थापन झाले आहे. १६५ ते १७० मतदान आमच्या बाजूने होईल. आमच्या माहितीनुसार अध्यक्षाच्या निवडीबाबत व्हीप लागू होत नाही. असा व्हीप काढण्याची कोणतीही तरतूद नियमात नाही, असे सुधीर मुनंगटीवार ( Sudhir Mungantiwar ) यांनी यावेळी म्हटले आहे. शिवसेनेकडून असे चित्र तयार केले जात आहे. की आमचा व्हीप मानावा लागेल. बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांनी युतीचा पाया रचला होता.
मागे विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक राज्यपालांनी लावली नाही हे चुकीचे आहे. महा विकास आघाडी सरकार मध्ये एकमत नव्हते. पण घाई घाईने जे नियम केले त्यामुळे राज्यपाल महोदयांनी त्यांना काही प्रश्न उपस्थित केले. नंतर हा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेला. हे जावई सासऱ्याचे नव्हे तर ज्या उप मुख्यमंत्र्यांनी मोठा त्याग केला. तिथे सासरे जरी दुसऱ्या पक्षाचे असले तरी जावई हे कर्तव्यनिष्ठ आहेत. राज्यपालांनी पेढा न भरवणे हा मनाचा कोतेपणा आहे, असा टोमणा मुनगंटीवार यांनी शरद पवार यांना लगावला आहे.
भाजप आणि शिवसेनेचे सरकार हे सर्वं लोकांचे सरकार आहे, असे मोठे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीला कसं सामोरं जायचे आहे, याच्या तांत्रिक बाबी विषयी या बैठकीत समजावून सांगण्यात आले आहे. भाजप आणि शिवसेनेच्या सर्व आमदारांना आश्वस्त केलं गेलं की, सर्व आमदारांच्या मतदारसंघातील अडचणी दूर केले जाणार आहेत.
हेही वाचा -Two NCP office bearers arrested : बंडखोर आमदार वास्तव्यास राहिलेल्या हॉटेलमध्ये तोतयागिरी? राष्ट्रवादीच्या 2 पदाधिकाऱ्यांना अटक