महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

CM Pays Homage To Sudhir Joshi : मराठी भूमिपुत्रांच्या हक्कांना आवाज देणारा सच्चा शिवसैनिक म्हणजे सुधीर जोशी – मुख्यमंत्री ठाकरे

शिवसेनेचे जेष्ठ नेते सुधीर जोशी यांचे आज निधन ( Shivsena leader Sudhir Joshi death ) झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली ( CM Pays Homage To Sudhir Joshi ) आहे. मराठी भूमिपुत्रांच्या हक्कांना आवाज देणारा सच्चा शिवसैनिक म्हणजे सुधीर जोशी, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केल्या.

सुधीर जोशी
सुधीर जोशी

By

Published : Feb 17, 2022, 10:55 PM IST

मुंबई - मराठी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांना आवाज देणारा सहृदयी नेता म्हणून सुधीर जोशी यांच्या निधनामुळे गमावला आहे. त्यांच्यासारखे व्रतस्थ आणि निष्ठावान असे उदाहरण आता दुर्मीळ झाले आहे, अशा शोकभावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते, माजी मंत्री सुधीर जोशी यांच्या निधनाबद्दल व्यक्त केल्या ( CM Pays Homage To Sudhir Joshi ) आहेत. तसेच दिवगंत ज्येष्ठ नेते जोशी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

वैयक्तिक हानी

दिवंगत सुधीरभाऊंनी मुंबईचे महापौर आणि महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री म्हणून दिलेले योगदान महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल, अशी श्रद्धांजलीही दिवंगत जोशी यांना अर्पण केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी ते पहिल्या फळीतील निष्ठावान शिवसैनिक होते. त्यांच्या निधनाने शिवसेना एका सच्चा शिवसैनिकाला मुकली आहे. सुधीरभाऊंच्या जाण्याने माझी वैयक्तिक हानी झाली आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी शोकभावनेत नमूद केले आहे.

राजकारण, समाजकारणात समतोल साधला

कार्यकर्त्याचा पिंड आणि जनसामान्यांबद्दल प्रचंड कळवळा असल्यानेच दिवंगत सुधीरभाऊंनी शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मराठी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांना आवाज देण्याचा लढा उभारला. शिवसेनाप्रमुखांसाठी ते पहिल्या फळीतील निष्ठावंत शिवसैनिक होते. त्यांच्या राजकारण आणि समाजकारणातील समतोल साधण्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे सुधीरभाऊ अखेरपर्यंत काम करत राहीले. मुंबई आणि महाराष्ट्रातील अनेक कामगार, कर्मचारी संघटनांची त्यांनी उत्कृष्ट बांधणी केली. या संघटनेमुळेच मराठी भूमिपुत्रांना अनेक रोजगार, नोकऱ्यांच्या उत्तमोत्तम संधी मिळविता आल्या. शिवसेनेचा मुंबईचा महापौर म्हणूनही त्यांनी मराठी माणसाचा आवाज बुलंद केला. जी-जी संधी मिळेल, त्याचे सुधीरभाऊंनी आपल्या धडाडीने सोने केले, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कामाचा ठसा उमटवला

सामान्य माणसांना, कष्टकरी-कामगारांना त्यांच्या न्याय हक्कांसाठी मदत करण्यात ते सातत्याने आघाडीवर होते. विधिमंडळात पोहचल्यावरही त्यांनी आपल्या अभ्यासू मांडणीने आणि अंगभूत हुशारीने अशाच प्रश्नांची मांडणी केली. त्यामाध्यमातून त्यांनी अनेक प्रश्नांवर आवाज उठवत, अनेकांना न्याय मिळवून दिला. राज्याचे महसूल मंत्री, शिक्षण मंत्री म्हणूनही त्यांना संधीही त्यांनी मिळाली. याठिकाणीही त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर कामाचा ठसा उमटवला. सुधीरभाऊ अखेरपर्यंत सामान्यांसाठी झटणारे निष्ठावंत कार्यकर्ते-नेतृत्व राहीले. त्यांच्या निधनामुळे मराठी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांना आवाज देणारा सहृदयी असा नेता आपण गमावला आहे. हा आघात सहन करण्याची त्यांच्या कुटुंबियांना शक्ती मिळावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details