महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'सामूहिक प्रयत्नातून धारावी पॅटर्नला यश, कुणा एकट्याने घेऊ नये श्रेय' - सामाजिक कार्यकर्ते राजू कोरडे

धारावीमधील कोरोना नियंत्रणाची दखल आंतरराष्ट्राय पातळीवर घेण्यात आली आहे. त्यामुळे याचे श्रेय घेण्याचे प्रयत्न काही पक्ष आणि संघटना करीत आहेत. धारावीत कोरोना रोखण्यासाठी अनेकांनी मदत केल्याचे सांगत याचे श्रेय कुणी एकाने घेऊ नये असे मत धारावीतील सामाजिक कार्यकर्ते राजू कोरडे यांनी व्यक्त केलं आहे.

Success of Dharavi through collective efforts
सामुहिक प्रयत्नाने धारावीला यश

By

Published : Jul 13, 2020, 6:44 PM IST

Updated : Jul 13, 2020, 7:24 PM IST

मुंबई- धारावीत कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावाला रोखण्यात यश आल्याने, श्रेय घेण्यासाठी आता चढाओढ लागली आहे. मात्र सामूहिक प्रयत्नाने धारावीला यश मिळाले असून कोणा एकट्याने हे श्रेय घेऊ नये असे, धारावी पुनर्वसन समितीचे अध्यक्ष आणि धारावीतील समाजसेवक राजेंद्र कोरडे यांनी म्हटले आहे. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी समजल्या जाणाऱ्या धारावीत करोनावर नियंत्रण यश आले आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाचं कौतुक केलं आहे. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षात श्रेयवादावरून चांगली जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

'सामूहिक प्रयत्नातून धारावी पॅटर्नला यश, कुणा एकट्याने घेऊ नये श्रेय'

धारावीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही उल्लेखनीय भूमिका बजावल्याने ही यश मिळाले असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. या श्रेयवादावर विविध स्तरात उलट सुलट प्रतिक्रिया येत असून धारावी पुनर्विकास समितीनेही नाराजी व्यक्त केलीय.

श्रेयवादावर एकमेकांनी यश लाटण्याचा जो प्रयत्न होतोय तो साफ चुकीचा आहे. कोरोनाच्या लढाईत अनेक संघटना आणि लोकांचं योगदान आहे हे कुणा एकट्या दुकट्याच यश नाही असं धा. पु. स अध्यक्ष राजेंद्र कोरडे यांनी म्हटलंय.

हेही वाचा -गेल्या 24 तासात 28 हजार 701 जणांना संसर्ग, तर 500 जणांचा मृत्यू

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाबद्दल मत मांडताना कोरडे म्हणाले की, संघाचे काम चांगले नाही असे कोणी म्हणणार नाही, पण धारावीतील करोना नियंत्रणाच्या कामात संघाने फक्त काही दिवसच धारावीकरांचे स्क्रिनिंग केले. अंदाजे 3000 पेक्षा लोकांचे हे स्क्रिनिंग नाही. इथे लाखो लोकं राहतात. त्यांना कोरोना काळात सर्व बंद असताना जेवण, काळजी घेण्यासाठी वस्तू आणि इतर मदत या देशातील अनेक छोट्या मोठ्या पक्ष आणि संघटनांनी पुरवल्या आहेत, हे विसरून चालणार नाही. भाजप - संघाचं यश लाटण्याचं काम नेहमीचेच आहे ते त्यांनी बंद करावं. धारावीचे यश हे एकट्याने घेणं अपराध ठरेल. सामूहिक कृती व एकत्रित प्रयत्नांच्या यशावर कुणीही आपला हक्क सांगू शकत नाही, असेही कोरडे म्हणाले.

Last Updated : Jul 13, 2020, 7:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details