मुंबई - विधान भवनाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या सुभाष उंदरे Subhash undare Death Vidhan Bhawan या व्यक्तीचा आज रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. उंदरे यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधिमंडळाबाहेर आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुभाष उंदरे या व्यक्तीचा आज मृत्यू झाला आहे. शेतीच्या घरगुती वादातून उंद्रे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. उपचारा दरम्यान त्यांचा आज मुंबईतील जे जे रुग्णालयात मृत्यू झाला.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी 23 ऑगस्ट रोजी विधान भवनाबाहेर सुभाष उंद्रे या 56 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना तातडीने जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान या आत्महत्येच्या प्रयत्नात सुभाष उंदरे हे ५६ टक्के भाजले होते.
का केला होता आत्महत्येचा प्रयत्न - उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील तांदुळवाडी या गावचे सुभाष उंदरे हे रहिवासी होते. त्यांनी गावातील शेतीच्या संदर्भात असलेल्या वादातून त्यांच्या दोन भावांमध्ये आणि त्यांच्यामध्ये वाद होता या वादाची पोलिसांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही या कारणास्तव उंद्रे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांना भाजलेल्या अवस्थेत जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तेव्हा ते 45 टक्के भाजले होते. गेले काही दिवस मृत्यूशी झुंज देत असलेल्या सुभाष उंद्रे यांचा आज सकाळी पावणे बारा वाजता जे जे रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती जेजे रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संजय सुरासे यांनी दिली आहे.