महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

PNB Scam Case : पीएनबी घोटाळ्यात आरोपी सुभाष शंकर परबला 26 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी - सीबीआयची इजिप्तमध्ये कारवाई

पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील ( PNB Scam Case ) मुख्य आरोपी असलेल्या नीरव मोदीच्या ( Nirav Modi ) जवळचा असलेला सुभाष शंकर परबला सीबीआयने अटक ( Subhash Shankar Parab Arrested By CBI ) केली. सीबीआयच्या पथकाने ही कारवाई इजिप्त देशातील काईरो या शहरात ( CBI Action In Egypt ) केली. त्यानंतर आरोपी सुभाष शंकरला मुंबईत आणण्यात आले असून, न्यायालयाने त्याला २६ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावणी ( Subhash Shankar In CBI Custody ) आहे.

कोट्यवधींच्या पीएनबी घोटाळ्यात आरोपी सुभाष शंकरला 26 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी
कोट्यवधींच्या पीएनबी घोटाळ्यात आरोपी सुभाष शंकरला 26 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी

By

Published : Apr 12, 2022, 6:46 PM IST

Updated : Apr 12, 2022, 7:31 PM IST

मुंबई : कोट्यवधींच्या पीएनबी घोटाळ्यात ( PNB Scam Case ) आरोपी सुभाष शंकर परबला 26 एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली ( Subhash Shankar Parab In CBI Custody ) आहे. सुभाष हा या घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदींच्या ( Nirav Modi ) जवळचा समजला जातो. आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात त्याला हजर करण्यात आले होते. सीबीआईने इंटरपोलच्या मदतीने इजिप्तवरून आरोपीला आणले ( CBI Action In Egypt ) आहे. सुभाष शंकर परब हा याप्रकरणातील १८ वा आरोपी आहे.

रेड कॉर्नर नोटीस होती :पीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीचा साथीदार सुभाष शंकर याला इजिप्तच्या कैरोहून भारतात परत आणण्यात यश आले ( Subhash Shankar Arrested By CBI ) आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदीला भारतात आणण्यात अद्याप सीबीआयला यश आले नाही आहे. भारताकडून या दोन्ही आरोपींची विरोधात रेड कॉर्नर नोटीस देखील तयारी करण्यात आली होती.



सीबीआय वकिलांकडून सांगण्यात आले की, तपासादरम्यान असे आढळून आले की, तो फसव्या एलओयूसाठी पीएनबी बँकेशी व्यवहार करत होता. परब याच्या सूचनेनुसार कागदपत्रे तयार करण्यात आली आणि त्याच्या सूचनेनुसार ती सादरही करण्यात आली होती. परदेशी बँकांशीही तो समन्वय साधत. तसेच खरेदीदारांच्या कर्जासाठी बँकेची निवड आणि सौदेबाजीही परब करत होता. तो दुबईत आणि नंतर कैरोला होता. 2015 पासून सर्व त्याच्या पूर्ण नियंत्रणात होते. अनेक मूळ कागदपत्रे अद्याप गायब आहेत. एलओयू कसे तयार केले गेले यावर तपासात अधिक माहिती देऊ शकेल. आरोपीला आज अटक करण्यात आली आहे. फंड रोटेशनवर सुभाष शंकर परबचे पूर्ण नियंत्रण होते. हाँगकाँगमध्येही असेच घडले. नीरव मोदी यानी ज्या दिवशी देश सोडला त्याच दिवशी परबही देश सोडून गेला. देशात काय चाललंय याची त्याला स्पष्ट माहिती होती असं देखील सीबीआयकडून कोर्टात सांगण्यात आले आहे. त्यामुळे अधिक चौकशीसाठी सीबीआय कोठडी आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.



सुभाष शंकर यांच्यावतीने वकील रेश्मा मुथा यांनी बाजू मांडली. त्याच्यावतीने त्या म्हणाल्या की, मी फक्त एक कर्मचारी होतो. तपास यंत्रणा मला आणि माझ्या कुटुंबाला त्रास देत आहे. मी एलओयूवर स्वाक्षरी करणारा अधिकृत नव्हतो. मी कधीही बँकेला वसुलीसाठी सूचना दिल्या नाहीत. आरोपानुसार एलओयूवर स्वाक्षरी करण्यात माझा सहभाग नव्हता. सर्व पुरावे कागदोपत्री स्वरूपात आहेत. त्यामुळे त्यांना कोठडीची गरज नाही. सर्व कागदपत्रे बँकेकडे किंवा तपास यंत्रणेकडे आहेत. न्यायालयीन कोठडी किंवा कमीत कमी सीबीआय कोठडी देण्यात यावी. मला आणि माझ्या कुटुंबासाला भीती आहे. पोलिसांच्या तपासात सहकार्य करण्यास मी तयार आहे, असा युक्तिवाद सुभाष शंकर परबच्या वकिलांकडून कोर्टासमोर करण्यात आला.

नीरव मोदीसोबत गेला होता पळून- सुभाष हा नीरव मोदीचा जवळचा सहकारी होता. त्याला देशात परत आणण्यासाठी सीबीआय अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होती. अखेर यात यश मिळालं. बँक फसवणूक प्रकरणातील हा एक आरोपी आहे. 49 वर्षीय सुभाष शंकर 2018 मध्ये नीरव मोदीसोबत भारतातून पळून गेल्याचं सांगितलं जात आहे. नीरव मोदीचा हा सर्वात जवळचा सहकारी आहे. सुभाष शंकरला भारतात आणल्यानंतर सीबीआयने त्याला न्यायालयात हजर केले.

इजिप्तमध्ये कारवाई - नीरव मोदीनं पीएनबी बँकेत सुमारे 6,500 कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. तो सध्या लंडनमधील तुरुंगात आहे. त्याला परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. ईडी नीरव मोदीच्या परदेशातील मालमत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. नीरव मोदीनं 2017 मध्ये त्याच्या कंपनी फायरस्टार डायमंड्सद्वारे आयकॉनिक रिदम हाऊस इमारत खरेदी केली होती. त्याचे हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये रूपांतर करण्याची त्यांची योजना होती. पीएनबी घोटाळ्यातून मिळालेल्या पैशातून त्याने बहुतांश मालमत्ता खरेदी केल्याची माहिती मिळत आहे. सीबीआयने इजिप्तच्या कैरोमध्ये मोठं ऑपरेशन करत PNB घोटाळ्यातील सुभाष शंकर या आरोपीला ताब्यात घेतलं. 49 वर्षीय सुभाष शंकर 2018 मध्ये नीरव मोदीसोबत भारतातून पळून गेल्याची माहिती आहे. नीरव मोदीचा हा सर्वात खास होता.

Last Updated : Apr 12, 2022, 7:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details