मुंबईतील - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 'घरोघरी तिरंगा मोहीम' सुरू आहे. या अभियानामध्ये सर्वच शिक्षण संस्था लहान थोर मंडळी सामाजिक संस्था राजकीय पक्ष विविध खाजगी संस्था देखील सहभागी झाल्या आहेत. ठिकठिकाणी तिरंग्याला अभिवादन देत स्वातंत्र्यसैनिकांना स्मरण केले जात आहे. त्यांच्या कार्याचा आढावा घेतला जातोय. विद्यार्थ्यांना आणि शालेय वयातील मुला-मुलींना स्वातंत्र आंदोलनाची माहिती दिली जात आहे. ठिकठिकाणी शालेय वयातील मुले मुली शाळेच्या पटांगणावर येत मोठ्या तिरंगाच्या भोवती भारताचा नकाशा तयार करत आहेत. तर काही विद्यार्थी मणिभवन सारख्या या आदर्श ठरल्या गेलेल्या वास्तूला भेट देत आहे. आज या ठिकाणी
मणिभवनातील गांधीजींची वास्तूला विद्यार्थ्यांची भेट; ईटीव्ही भारतचा खास रिपोर्ट आठवणी जाग्या करण्यासाठी आणले - मणिभवन या ठिकाणी भारतीय पर्यटन मंत्रालय यांची सहाय्यक संचालक मुंबई विभाग यादेखील हजर होते. ते विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना तसेच शालेय वयातील विद्यार्थ्यांना महात्मा गांधींच्या संदर्भात माहिती व्हावी म्हणून महात्मा गांधींच्या साहित्य महात्मा गांधींचे पुस्तक, महात्मा गांधींचा चरखा, महात्मा गांधीजींचे ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन करतानाचे फोटो त्यांच्या प्रतिकृती त्या संदर्भातला विविध आठवणी जाग्या करण्यासाठी आणले होते.
आम्ही महाविद्यालयांना संपर्क केला - पर्यटन मंत्रालयाच्या विभागांतर्गत पर्यटनाच्या संदर्भात प्रेक्षकांना विविध पर्यटनस्थळे आणि त्यांची माहिती देणाऱ्या नूतन कानडे यांनी ईटीव्ही भारतला माहिती दिली की ,''विद्यार्थ्यांना एकूणच स्वातंत्र्य आंदोलन काय महात्मा गांधींचे योगदान काय? स्वातंत्र आंदोलनाचा उद्देश काय? आणि आज त्याचा संबंध काय? हे जाणून घेण्यासाठी आम्ही महाविद्यालयांना संपर्क केला. त्या महाविद्यालयाचे विद्यार्थी या ठिकाणी हजर आहेत आणि ते बापूजींना अभिवादन करत आहेत.''
शिक्षकांचा मणिभवनमध्ये उत्साह - आज मुंबईतील कुलाबा येथील केंद्रीय विद्यालय शाळा क्रमांक दोन येथील विद्यार्थ्यांनी देखील मणिभवनला महात्माजींचा चरखा त्यांनी केलेले कार्य त्यांच्या आंदोलनाचे त्यावेळचे फोटो त्यांचे पुस्तक त्यांच्या वस्तू हे सगळं पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मणिभवनला भेट दिली होती. कुलाबा केंद्रीय विद्यालय शाळा क्रमांक दोनच्या शिक्षिका मिनू सिंग यांनी सांगितले की,'' मुलांना हे महत्त्व समजलं पाहिजे एरवी आपण आपापल्या पद्धतीने जीवन जगतो. मात्र, 9 ऑगस्ट 15 ऑगस्ट आणि तो आठवडा हा देश भावनांना भरून गेलाचा असतो विद्यार्थ्यांना या निमित्ताने स्वातंत्र्य आंदोलन आणि गांधींची अहिंसा किती महत्त्वाची आहे आणि प्रत्यक्ष आज देखील एकमेकांविषयी सर्व जाती धर्मातल्या लोकांनी प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे, बंधुभाव ठेवावा या संदर्भात आम्ही मुलांना मनीभवनला घेऊन आलो असल्याचं त्यांनी सांगितलं.''
पर्यटन मंत्रालयाने देखील साजरा केला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव - भारतीय पर्यटन मंतलाच्या मुंबई विभागीय सहाय्यक संचालिका साररूप दत्त यांनी ईटीव्ही भारतला माहिती दिली की, '' पर्यटन मंत्रालयाच्या वतीने देशभर आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि घरोघरी तिरंगा अभियान राबवत आहोत. या अभियानाच्या अंतर्गत आम्ही विविध प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत आहोत. महात्मा गांधींच्या वास्तूला म्हणजे मणिभवन सारख्या ऐतिहासिक आणि स्वातंत्र्यलढाशी संबंधित वास्तूंना देखील समजून घेत आहोत. तसेच संग्रहालय अशा विविध मैदानांना सुद्धा भेटी देण्यासाठी वेगवेगळ्या संस्था संघटना किंवा शालेय शिक्षण संस्था महाविद्यालयीन शिक्षण संस्था त्यांना घेऊन जात आहोत.
हेही वाचा -Har Ghar Tiranga: तिरंगा ध्वजासोबत तिरंगा फेटा, टोपी, ओढणी नाशिकच्या बाजारात दाखल