मुंबई -महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४ मार्चला होणारी पूर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर राज्यभरातून परीक्षार्थिनी संताप व्यक्त केला आणि आयोगाने परीक्षेची दुसरी तारीख जाहीर केली. मात्र, नियोजित परीक्षा पुढे ढकलल्याने छात्र भारती विद्यार्थी संघटनेने एमपीएसी आयोगाच्या त्या प्रसिद्धी पत्रकाची होळी केली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काही दिवसांवर आलेली परीक्षा अचानक पुढे ढकल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष निमार्ण झाला आहे. मोठ्या प्रमाणात विध्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत. गुरुवारी सायंकाळी 6 वाजता छात्र भारती विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते मुंबई कार्यालय (दादर)येथे एकत्र जमले. त्यानंतर त्यांनी एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णयावरून महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला. तसेच आयोगाने काढलेल्या प्रसिद्ध पत्रकाची होळी करण्यात आली.