मुंबई -एअर इंडियाचे (Air India) पहिले विमान युक्रेनमध्ये (Students Stuck Ukraine) अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन मुंबई विमानतळावर पोहोचले आहे. युक्रेनमधून रोमानियाला आल्यानंतर तेथून एकूण २१९ विद्यार्थी मुंबईत दाखल झाले आहेत. केंद्रीय मंत्री पियूष गोयल (Union Minister Piyush Goyal) यांनी या विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या देखील स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित होत्या.
- विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद -
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या भीषण युद्धाच्या (Russia Ukraine War) पार्श्वभूमीवर एक आनंदाची बातमी आहे. युक्रेनमध्ये (Ukraine) अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे पहिले विमान आज संध्याकाळी आठच्या सुमारास मुंबईत दाखल झाले आहे. 219 विद्यार्थ्यांना घेऊन हे विमान रोमानियावरुन निघाले आणि शनिवारी संध्याकाळी हे विमान मुंबईत दाखल झाले आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Piyush Goyal) यांनी विमानतळावर उपस्थित राहून या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी मायभूमीत परतल्याचा आनंद या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होता. अजूनही एक विमान दिल्लीत दाखल होणार असल्याची माहिती मंत्री गोयल यांनी दिली.
- पियुष गोयल यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत -
युद्धग्रस्त युक्रेनमधून ( Russia Ukraine Crisis ) विमानाद्वारे येत असलेल्या भारतीयांसाठी ( Indians Arriving From Ukraine ) मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Mumbai ) विशेष कॉरिडॉर स्थापन करण्यात आला ( First Rescue Plane Will Reaching Mumbai ) आहे. युक्रेनमधून येणाऱ्या भारतीयांकडे कोविड लसीकरण प्रमाणपत्र अथवा आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली. दरम्यान, या विमानाने रोमानियातून उड्डाण केले होते.
- एअर इंडियाच्या विमानाने रोमानियामधून केले होते उड्डाण -