महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

घाटकोपरमध्ये विद्यार्थ्यांकडून प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी

घाटकोपर येथे शालेय विद्यार्थ्यांनी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी केली असून फटाके न फोडता हे विद्यार्थी गडकिल्ल्यात रमले आहेत

घाटकोपरमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली प्रदूषण मुक्त दिवाळी

By

Published : Oct 28, 2019, 9:45 AM IST

मुंबई -शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे सर्वांनाच मोठे आकर्षण असते. दिवाळीत मुले सुटीच्या वेळी ठिकठिकाणी गडकिल्ल्यांची प्रतिकृती साकारत असतात. घाटकोपरच्या पारशिवाडी विभागात ठिकठिकाणी अशाच प्रकारचे गडकिल्ले मुलांनी साकारले असून फटाके न फोडता प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी केली आहे.

घाटकोपरमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली प्रदूषण मुक्त दिवाळी

हेही वाचा... शिवाजी महाराजांचा आधुनिक 'प्रपातगड',नागपुरात दिवाळीनिमित्त काल्पनिक किल्ल्याचे प्रात्यक्षिक

अभ्यासक्रमातील शिवाजी महाराज यांच्या किल्याची माहिती घेत मुले साहित्य जमा करतात. यानंतर हुबेहूब पन्हाळ गड, रायगड किल्ला साकारताना दिसत आहेत. या गडकिल्ल्यांबरोबर ही मुले प्रदूषण मुक्त दिवाळी आणि गडकिल्ले संरक्षण या बाबत संदेश देत आहेत.

हेही वाचा... राज्यभरात उत्साहात लक्ष्मीपूजन साजरे..

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details