महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Achievements75 शिवानी कुमारची संघर्षकथा भारतीय रेल्वेत मशीनिस्ट पदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला

देशाच्या अमृत महोत्सवा Amrit Mahotsav निमित्ताने विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिला पुरुष युवक यांनी कर्तृत्वाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे मध्य रेल्वे Central Railway वरील माटुंगा वर्कशॉप येथील शिवानी शिवराज कुमार Shivani Shivraj Kumar या महिलेच्या कर्तृत्वाचा घेण्यात आला आहे

Shivani Shivraj Kumar
शिवानी कुमारची संघर्षकथा

By

Published : Aug 13, 2022, 2:25 PM IST

देशाच्या अमृत महोत्सवा Amrit Mahotsav निमित्ताने विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिला पुरुष युवक यांनी कर्तृत्वाच्या जोरावर ज्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे 21व्या शतकात पुरुषांच्या खासदाला खांदा लावत प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया खंबीरपणे कार्यरत आहे .आयुष्यात येणारे प्रत्येक संकटावर मात करून समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या स्त्रिया या कर्तृत्वान ठरतात भारतीय रेल्वेतील पहिली व एकमेव मशिनिस्ट म्हणून कार्यरत First and only Machinist in Indian Railways असलेली शिवानी शिवराज कुमार. या 50 वर्षीय महिलेच्या कर्तुत्वाचा घेतलेला हा आढावा. देशाच्या अमृत महोत्सवा निमित्ताने विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिला पुरुष युवक यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण आहे मध्य रेल्वे वरील Central Railway माटुंगा वर्कशॉप येथील शिवानी शिवराज कुमार Shivani Shivraj Kumar या मशीनिस्ट पदावर काम करत आहेत.

शिवानी कुमारची संघर्षकथा भारतीय रेल्वेत मशीनिस्ट पदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला




दहा वर्षानंतर मशिनिस्ट पदासाठी दिली परीक्षादहावीची परीक्षा पास झाल्यावर घरच्यांनी शिवानी यांच्या सोळाव्या वर्षी लग्न लावून दिले. अहमदनगर तासगाव येथे शिवानीने लग्नानंतर मुंबईत आली लग्नानंतर तीन वर्षांनी पतीचे निधन झाले. त्यांच्या पदरात तीन वर्षाचा मुलगा आणि अडीच वर्षाची मुलीची जबाबदारी पडली घरच्यांच्या पाठिंबामुळे 1990 मध्ये भारतीय रेल्वेत पतीच्या जागी त्या प्रथम मदतनीस खलाशी म्हणून रुजू झाल्या. रेल्वेत रुजू झाल्यावर प्रथम मदतनीस खलाशी म्हणून त्यांनी बडती देण्यात आली त्यानंतर माटुंगा वर्कशॉप मध्ये दहा वर्षानंतर मशिनिस्ट पदासाठी शिवानीला बढती मिळण्यासाठी परीक्षा दिली शिवानी सोबत परीक्षा देण्याकरिता आणखी तीन महिलांनी देखील परीक्षा दिली होती. मात्र शिवानी यांची एकमेव मशिनिस्ट म्हणून बढती करण्यात आली होती.




संपूर्ण भारतीय रेल्वेत त्या एकमेव मशीनिस्ट बढती मिळाल्यावर प्रशिक्षण दरम्यान प्रथम भीती वाटत होती. पुरुष ते काम करतात मग मी का करू शकत नाही. त्यावेळी केवळ पुरुष सहकाऱ्यांनी दिलेले प्रशिक्षण व मदतीमुळे मी हे काम करू शकले असे शिवानीने सांगितले. गेल्या 27 वर्ष शिवानी माटुंगा वर्कशॉप मध्ये कार्यरत आहे. श्रेणी एक मधील मशिनिस्ट म्हणून सध्या त्या कार्यरत आहे. संपूर्ण भारतीय रेल्वेत त्या एकमेव मशीनिष्ठ आहे. मशिनीश म्हणून कार्यरत असताना त्यांचे सहकारी शिवराय कुमार यांनी त्यांच्याशी विवाह केला .शिवकुमार यांनीही वेळोवेळी पाठिंबा दिल्यामुळे मी काम करू शकल्याचे त्या म्हणाले. सध्या भारतीय रेल्वे चाकाचे टनिगसाठी लिथ मशीनचा वापर केला जातो. लोकल एक्सप्रेसच्या चाकाचे घर्षण झाल्यावर आकार बदलतो या चाकांना टनिग देऊन त्यांना मूळ आकारात आणण्याचे काम शिवानी या करतात. त्यांच्याकडे नवीन जुने चाके टनिगसाठी येतात. एक गाडीचे चाक 18 महिन्याने एकदा टनिग साठी येते त्यानंतर ते डायमीटर मध्ये दाबू त्यात काय दोष आहे ते तपासला जातो मेल एक्सप्रेस चे एक चाकाचे विंगची साईज 918 तर कंडमीस 955 विंग साईज 867 असते एक चाकाचे वजन हे दीड टन असते.



लोकांच्या सुरक्षेची जबाबदारीएक्सप्रेस पेक्षा लोकलच्या चाकाचे वजन जास्ती असते. दिवसाला 15 ते 16 चाकाची दुरुस्ती केली जाते. यात दोपरहित माल असलेले चाके चाकाच्या खाली दगड आल्यावर खड्डा पडलेले चाक कडा पातळ झालेला तुटलेले चाक टनिगला येतात. पूर्वी मेनवली मशीन ने काम केले जायचे तेव्हा हाताचे काम जास्ती असायचे काळाने रूप आधुनिक तंत्रज्ञान यामुळे त्यात बदल होऊन आत्याधुनिक मशीन आल्याने त्यामुळे हाताचे काम कमी झाले आणि नवीन तंत्रज्ञान असलेल्या मशीनमुळे चाकाची दुरुस्ती करण्याचे वेग वाढला पूर्वी दिवसाला साथ चाके टनिग केले जायची आता 14 ते 15 केले जातात एक चाकाचे टनिग करण्यासाठी 20 ते 25 मिनिट लागतात चाकात एखादी कमतरता असल्यास ती डिपार्कटर सिस्टम गाईडने निदर्शनास येते हे चाक तयार करताना काळजीपूर्वक काम करावे लागते एक मिमी मालाची किंमत 1150 रुपये आहे त्यामुळे कामीत कमी माल इलेक्ट्रिसिटी वापरून रेल्वेच्या पैशाची बचत आदी सर्व गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात नवीन चाक तयार करताना त्याच्या मधील अंतर 1600 एम एम ठेवावे लागते तसेच त्याच्या चाकाच्या कड्या महत्त्वाच्या असतात नवीन मशीन वापरताना त्याचे आवाजावर त्यात बिघाड झाली हे कळते. तसेच हे सर्व काम करत असताना हे देखील लक्षात ठेवा लागते की आपण करत असलेल्या कामाची जबाबदारी ही तेवढीच मोठी आहे रेल्वेच्या अतिशय महत्त्वाचा भाग असलेले चाक त्याचे काम आपल्यावर असल्याने लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी देखील आपल्यावर सर्वाधिक आहे याचे देखील भान ठेवावे लागते असे शिवानी ने म्हटले आहे.



महिलांनी स्वतला केव्हाही कमजोर समजू नयेशिवानीने असेही म्हटले आहे की स्त्रियांनी केव्हाही स्वतःला कमजोर आणि निहत्त समजू नये स्त्रिया जर मोठ मोठ्या महापुरुषांना जन्म देऊ शकतात तर मग पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून का चालू शकत नाही. सर्वात पहिले महिलांनी आपल्या मनातील भीती दूर करायला पाहिजेत. महिलांना देखील पुरुषांनी समजून घ्यायला पाहिजे ज्याप्रमाणे मला माझ्या पतीने आणि माझ्यासोबत काम करणाऱ्या माझ्या इतर सहकारी पुरुषांनी मला समजून घेतले आणि हे काम करण्याची संधी मला मध्य रेल्वेने उपलब्ध करून दिली त्यामुळे महिलांनी स्वतला केव्हाही कमजोर समजू नये असे संदेश देखील शिवानी कुमार या महिलेने दिली आहे.

हेही वाचाChangemakers विज्ञान युगातही मासिक पाळी ठरतेय विटाळ क्षितिज स्वयंसेवी संस्था करत आहे जनजागृती

ABOUT THE AUTHOR

...view details