महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धोकादायक पोलीस वसाहतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे - देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis

मोकळ्या जागेवर इमारती बांधाव्यात आणि तेथे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांशी आणि पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

By

Published : Aug 5, 2021, 3:17 PM IST

Updated : Aug 5, 2021, 3:23 PM IST

मुंबई -परळ येथील धोकादायक झालेल्या नायगाव पोलीस वसाहत पोलिसांच्या कुटुंबीयांना घरे रिकामी करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या पोलीस वसाहतींची दौरा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. दरम्यान, राज्य सरकारने पोलीस वसाहतींची तत्काळ दुरुस्ती करावी, निर्णयाला स्थगिती द्यावी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी यांनी केली.

'मोकळ्या जागेवर इमारती बांधाव्यात आणि तेथे पुनर्वसन करावे'

परळ येथील नायगाव पोलीस वसाहत जर्जर झाल्या आहेत. धोकादायक इमारती झाल्याने पोलिसांना नोटीस बजावली आहे. फडणवीस यांनी नायगाव पोलीस वसाहतीची पाहणी करून रहिवाशांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. कोरोनाचा काळ आहे. अशावेळी घाईघाईत या रहिवाशांना बेघर करणे योग्य नाही. तसेच जेथे स्थलांतर करण्याचे नियोजन केले आहे, त्यापेक्षा खराब आहेत. त्यामुळे मोकळ्या जागेवर इमारती बांधाव्यात आणि तेथे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांशी आणि पोलीस आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच पोलिसांच्या भावना जाणून घेण्यासाठी इथे आलो आहे. यात कोणतेही राजकारण नाही. पोलीस विरुद्ध सरकार असा संघर्षाचाही प्रश्न नाही. आमच्या सहकाऱ्यांनी या वसाहतीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी मला भेट देण्याची विनंती केली. त्यामुळे मी इथे आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

'आमच्या प्रस्तावावर काम करावे'

बीडीडी चाळीतल्या पोलिसांना आम्ही संरक्षण दिले होते. भलेही या सरकारने त्याचे भूमिपूजन केले होते. पण आम्ही टेंडर काढले. निम्म्याहून जास्त प्रक्रिया आम्ही पार पाडली. त्याची अंमलबजावणी आता सुरू आहे, असे सांगतानाच आमच्या सरकारने पोलीस हौसिंगचा प्रस्ताव तयार केला होता. त्यावर राज्य सरकारने काम केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

Last Updated : Aug 5, 2021, 3:23 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details