मुंबई -जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आल्याने यूके, युरोप, मध्य पूर्व, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिल या देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना ७ दिवस संस्थात्मक विलगीकरणात बंधनकारक आहे. मात्र, काही प्रवाशांकडून विलगीकरणापासून पळवाटा शोधून नियम धाब्यावर धरले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालिकेने नवी सुधारित नियमावली जारी केली आहे. त्यामुळे नियम धाब्यावर धरल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कायदेशीर कारवाई -
मुंबई विमानतळावर विदेशातून हवाईमार्गे येणाऱ्या प्रवाशांसाठी २१ डिसेंबर व २७ डिसेंबर रोजी २०२० रोजीच्या आदेशानुसार कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. त्यानुसार यूके, युरोप, मध्य पूर्व, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिल या देशातून मुंबईत येणा-या प्रवाशांना ७ दिवस संस्थात्मक विलगीकरणात राहणे सक्तीचे करण्यात आले आहे. मात्र काही प्रवाशांकडून नियमाची अंमलबजावणी केली जात नसून गैरप्रकार केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालिकेने सुधारित कडक नियमावली जारी केली असून त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरु केली आहे. त्यामुळे नियम धाब्यावर धऱणाऱ्य़ा प्रवाशांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.