मुंबई- आपल्या कुटुंबासाठी गाडी नाकारणाऱ्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपले एक वर्षाचे मानधन महापौर निधीसाठी दिले आहे. त्यानंतर आता मलनिस्सारण प्रकल्पातून वाया जाणारे पाणी महापौर बंगल्यातील बागेमधील झाडांसाठी वापरण्याचा निर्णय महापौरांनी घेतला आहे. असा निर्णय घेऊन महापौरांनी मुंबईकर आणि लोकप्रतिनिधींसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
पुनर्प्रक्रिया केलेल्या सांडपाण्यातून महापौर बंगल्यातील बाग फुलणार हेही वाचा -शाळांच्या अनुदानाचे धोरण बदली; राज्यात अनुदानित शिक्षण संस्थांना मिळणार बळ
मुंबईत पाऊस पडेल की नाही, पडला तर कधी पडेल? असे अनेक प्रश्न असतात. त्यातच पाऊस पडला नाही तर पाणी कपातीची टांगती तलवार मुंबईकरांवर असते. नागरिकांनी रेनवॉटर हार्वेस्टिंग, बोअरिंग, एसटीपी (मलनिस्सारण प्रकल्प) प्लान्ट लावून आपल्या इमारतीसाठी पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त पाणी वापरावे, असे आवाहन पालिकेकडून केले जाते. मात्र, त्याची अंमलबजावणी केली जात नाही.
पालिकेने केलेल्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला नसला, तरी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुढाकार घेऊन महापौर बंगल्यातील बाग एसटीपी (मलनिस्सारण प्रकल्प) प्लान्टमधून वाया जाणाऱ्या पाण्यापासून फुलवण्याचा निर्णय घेतला आहे. बाणगंगा नदीजवळ एसटीपी प्लान्ट असून त्यामधून वाया जाणारे पाणी भायखळा येथील राणीबागेतील महापौर बंगल्यात आणून ते पाणी बागेतील झाडांना घातले जाणार आहे.
हेही वाचा -हप्ता चालू, काम बंद; किरीट सोमय्या यांचा सरकारवर आरोप
काय आहे बाणगंगा एसटीपी प्रकल्प -
मलबार हिल येथील बाणगंगा परिसरात मलनिस्सारण विभागाने जून २०१४ मध्ये सांडपाणी प्रक्रिया केंद्राला सुरुवात केली. या सांडपाणी प्रक्रिया केंद्रात दर दिवशी १.५ दशलक्ष लिटर म्हणजेच १५ लाख लिटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते. या प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर पाणी पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी करणे शक्य आहे. मात्र, प्रक्रिया केलेल्या पाण्यासाठी स्वतंत्र वितरण व्यवस्थेची गरज आहे.