महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा, देखाव्याच्या माध्यमातून बाप्पाकडे प्रार्थना - पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा

सायन परिसरातील फ्रांकलिन पाॅल यानं एक घरगुती देखावा साकारला आहे. हिंदमाता परिसरात जोरदार पाऊस झाल्यानंतर जी परिस्थिती होते ती दाखवण्यात आली आहे. सोबतच बाप्पाची मूर्ती ही शाडू मातीनं साकारण्यात आली आहे. तर बाप्पा विराजमान असलेली लाकडी खोडही मातीनंच बनवली आहे.

girangao
girangao

By

Published : Sep 13, 2021, 4:04 PM IST

मुंबई - कोरोनामुळे यंदाही गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा होत आहे. दरवर्षी सार्वजनिक गणेश मंडळातून देखाव्याद्वारे सामाजिक संदेश दिले जातात. सायन प्रतीक्षा नगर येथे राहणारे फ्रांकलिन पाॅल यांनी मुंबईची होणारी तू मुंबई या थीम वरती एक आगळी वेगळी कलाकृती उभारली आहे. या सजावटीच्या माध्यमातून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास दाखवण्यात आला आहे.

देखाव्याच्या माध्यमातून बाप्पाकडे प्रार्थना
मुंबईत पावसाळ्यात सखल भागात पाणी साचणं हे नेहमीच बघायला मिळत असते. अशातच सायन परिसरातील फ्रांकलिन पाॅल यानं एक घरगुती देखावा साकारला आहे. हिंदमाता परिसरात जोरदार पाऊस झाल्यानंतर जी परिस्थिती होते ती दाखवण्यात आली आहे. सोबतच बाप्पाची मूर्ती ही शाडू मातीनं साकारण्यात आली आहे. तर बाप्पा विराजमान असलेली लाकडी खोडही मातीनंच बनवली आहे.
मुंबईतील पूरस्थिती

मुंबईची तुंबई
मुंबईसाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ते आम्ही हा देखावा तयार केला आहे. दरवेळी पाऊस आला की पूरस्थिती निर्माण करते आपल्याही डोक्यात हे रोजच आहे. त्यामुळे लोकांपर्यंत एक सामाजिक संदेश पोहोचविण्यासाठी आम्ही हा देखावा तयार केलेला आहे. या ठिकाणी आम्ही दादर हिंदमाता येथील दरवर्षी पावसामुळे उद्भवणारी परिस्थिती दाखवली आहे. मात्र, अनेक उपाययोजना करून सुद्धा हिंदमाताची मुंबईहून तुंबई होणे काही थांबलेले नाही. पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबाबा अशी प्रार्थना आम्ही बाप्पा केली असल्याचे फ्रांकलिन पाॅल यांनी सांगितले.

हेही वाचा -परिवहन मंत्री अनिल परब गोत्यात; किरीट सोमय्यांच्या रडारवर 11 मंत्री, सरकारचा डेरा डळमळीत?

ABOUT THE AUTHOR

...view details