महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rakesh Jhunjhunwla राकेश झुनझुनवाला मधुमेहाशी संबंधित या समस्यांनी होते ग्रस्त - मधुमेहामुळे सतत ढासळत होती प्रकृती

दिग्गज गुंतवणूकदारांपैकी एक बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला Rakesh Jhunjhunwala यांचे रविवारी निधन झाले ते दीर्घकाळापासून मधुमेह आणि संबंधित मूत्रपिंड-यकृत रोगांशी लढत होते काही आठवड्यांपूर्वी आरोग्याच्या समस्येमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

राकेश झुनझुनवाला
राकेश झुनझुनवाला

By

Published : Aug 14, 2022, 2:49 PM IST

मुंबई - शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदारांपैकी एक बिग बुल म्हणून प्रसिद्ध असलेले राकेश झुनझुनवाला Rakesh Jhunjhunwala यांचे रविवारी निधन झाले. ते विविध आजारांनी त्रस्त होते. रविवारी सकाळी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना ब्रीचकॅण्डी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ते दीर्घकाळापासून मधुमेह आणि संबंधित मूत्रपिंड-यकृत रोगांशी लढत होते. काही आठवड्यांपूर्वी आरोग्याच्या समस्येमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतरही त्यांची प्रकृती खालावली होती. राकेश झुनझुनवाला यांच्या निधनाने संपूर्ण देश हादरला आहे.

जास्त वजन आणि मधुमेहामुळे सतत ढासळत होती प्रकृती : आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जास्त वजन आणि मधुमेहामुळे त्यांची प्रकृती सतत ढासळत होती. हे दोन्ही घटक कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्यविषयक अडचणी वाढवू शकतात, म्हणूनच प्रत्येकाला वजन, मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. मधुमेहाचा शरीराच्या इतर भागांवर कसा परिणाम होतो आणि गंभीर समस्या टाळण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत हे समजून घेऊया.



जास्त वजन हे मधुमेहींसाठी हानिकारक :वजन वाढणे हे कोणत्याही व्यक्तीसाठी आरोग्याच्या समस्यांचे कारण असू शकते. विशेषतः जर तुम्हाला मधुमेहाची समस्या असेल तर याबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. लठ्ठपणामुळे मधुमेह होण्याचा धोका देखील वाढतो. जर तुम्हाला आधीच मधुमेह असेल तर लठ्ठपणाशी संबंधित गुंतागुंत तुमच्यासाठी समस्या निर्माण करू शकतात. यामुळेच प्रत्येकाने वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आवश्यक उपाय करत राहण्याचा सल्ला दिला आहे.



झुनझुनवाला डायबेटिक किडनीच्या समस्येने होते त्रस्त :वैद्यकीय अहवालानुसार, मधुमेहाचा शरीराच्या अनेक अवयवांवर नकारात्मक परिणाम होतो. ज्यामध्ये किडनीशी संबंधित गंभीर समस्या आणि काही परिस्थितींमध्ये किडनी निकामी होण्याचा संभाव्य धोका असतो. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, किडनी ही नेफ्रॉन नावाच्या लाखो लहान फिल्टरपासून बनलेली असते. ज्या लोकांमध्ये सतत रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त असते, अशा स्थितीमुळे नेफ्रॉन आणि किडनीच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. मधुमेह असलेल्या बहुतेक लोकांना उच्च रक्तदाबाचा धोका असतो. ज्यामुळे किडनी समस्या उद्भवू शकतात.



मधुमेहामुळे यकृताच्या समस्या :किडनीप्रमाणेच मधुमेहामुळेही यकृताशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर रोग मधुमेह असलेल्या लोकांमध्ये अधिक सामान्य आहे. या आजारात यकृतामध्ये अतिरिक्त चरबी जमा होण्यास सुरुवात होते. ज्यामुळे यकृताला सामान्यपणे कार्य करणे कठीण होते. या प्रकारची समस्या टाइप-2 मधुमेह असलेल्या बहुतेक लोकांमध्ये दिसून येते. वृत्तानुसार, राकेश झुनझुनवाला यांनाही मधुमेहामुळे यकृताशी संबंधित समस्या होत्या, त्यांच्यावर उपचार सुरू होते.

मधुमेहग्रस्त असलेल्यांनी काय करावे? : डायबिटीज असेल तर किडनी-लिव्हरचा त्रास होईलच असे नाही, ते टाळताही येते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रक्तातील साखरेची पातळी आणि वजन नियंत्रित करणे. मधुमेहामुळे होणारी शारीरिक गुंतागुंत टाळण्यासाठी सकस आणि पौष्टिक आहार घेण्यासोबतच नियमित व्यायामाची सवय लावायला हवी. शारीरिक निष्क्रियतेमुळे मधुमेहाची गुंतागुंत होण्याचा धोका वाढू शकतो.

हेही वाचा -Bigbul Rakesh Jhunjhunwala of Share Market बिगबुल राकेश झुनझुनवाला यांचा जीवनप्रवास गुंतवणूकदारांसाठी प्रेरणादायी

ABOUT THE AUTHOR

...view details