महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 12, 2021, 6:51 PM IST

ETV Bharat / city

जागतिक परिचारिका दिन विशेष - आपल्या मुलांना स्वत:पासून दूर ठेवत कोरोना काळात परिचारिकांनी बजावली सेवा

2020 हे वर्ष संपूर्ण जगावर संकट घेऊन आलं. असं संकट ज्यामध्ये शत्रू अदृश्य होता. रोज हा शत्रू लाखो लोकांना बाधित करत होता. मग या शत्रू सोबत लढाई सुरु झाली, ती लढाई होती वैद्यकीय. यात डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक मैदानात उतरून या अदृश्य कोरोना विरोधात लढाई लढू लागले. अगदी आपल्या कुटुंबाचा देखील यांनी विचार केला नाही. आपल्या लहान चिल्यापिल्यांना दूर ठेवून परिचारिका रुग्णालयात रुग्णांची सेवा करत होत्या.

कामा रुग्णालय
कामा रुग्णालय

मुंबई -2020 हे वर्ष संपूर्ण जगावर संकट घेऊन आलं. असं संकट ज्यामध्ये शत्रू अदृश्य होता. रोज हा शत्रू लाखो लोकांना बाधित करत होता. मग या शत्रू सोबत लढाई सुरु झाली, ती लढाई होती वैद्यकीय. यात डॉक्टर, नर्स, आरोग्य सेवक मैदानात उतरून या अदृश्य कोरोना विरोधात लढाई लढू लागले. अगदी आपल्या कुटुंबाचा देखील यांनी विचार केला नाही. आपल्या लहान चिल्यापिल्यांना दूर ठेवून परिचारिका रुग्णालयात रुग्णांची सेवा करत होत्या. तर अनेक परिचारिकांनी अवघं एक वर्षाचे मुलं शेजाऱ्यांकडे ठेवून, कोरोनाविरोधात दोन हात केले. जागतिक परिचारिका दिनानिमित्त कामा रुग्णालयातील परिचारिकांनी स्वतःचे अनुभव कथन केले आहेत. हे अनुभव डोळ्यांच्या कडा ओल्या करणारे आहेत.

परिचारिका अपेक्षा शिवरकर सांगतात

" हा रोग नवीन होता. कोरोना संदर्भात कोणालाही कोणतीही कल्पना किंवा औषधोपचार याविषयी ज्ञान नव्हतं. मार्चमध्ये आलेला कोरोना, वाढलेली रुग्ण संख्या, चिंतेचं वातावरण निर्माण करत होते. या पहिल्या टप्प्यातच मी स्वतः कोरोनाग्रस्त झाले, त्यामुळे कुटुंबाची चिंता वाढली. क्वारंटाईन कसं व्हावं याचीही पूर्ण माहिती नव्हती. रोग नावा असल्याने औषधोपचार माहिती नव्हते, कोरोना झाल्यामुळे लहान मुलांना आमच्यापासून दूर ठेवण्यात आले. कोरोनातून बरे झाल्यानंतर देखील आम्ही कोरोना रुग्णांच्या संपर्क होतो, त्यामुळे तब्बल 9 महिने आम्ही आमच्या मुलांना आमच्यापासून दूर ठेवले. तसेच वृद्ध सासू-सासरे, आई,वडील यांचीही काळजी घेणं महत्त्वाचं होतं तेही आजारी पडले. यातच कर्तव्यावर असताना रुग्णांना समजावणं, त्यांचं मानसिक स्वस्थ्य स्थिर ठेवणे हे आव्हान होते.

आपल्या मुलांना स्वत:पासून दूर ठेवत कोरोना काळात परिचारिकांनी बजावली सेवा

परिचारिका सुषमा निगरे-पाटील सांगतात

कोरोना आला तेव्हा मी स्वतः आठ महिन्यांची गर्भवती होते. डिलिव्हरी नंतर मेटरनिटी लिव्ह संपल्यानंतर कर्तव्यावर रुजू झाले. घरी लहान मूल असल्याने अधिक काळजी घ्यावी लागत होती. माझे पती आणि मी आम्ही दोघेही रुग्णसेवेत काम करतोय. घरी असणारे लहान मुल शेजारच्या काकूंकडे ठेवावे लागते. कामावरून घरी गेल्यानंतर पहिल्यांदा पूर्णपणे सॅनिटायझ होऊन, योग्य आंघोळ करुन , स्टिम घेऊन, गरम पाणी घेवूनच मुलाला जवळ घ्यावं लागतं. महत्त्वाचं म्हणजे स्तनपान सुरू असल्याने लस घेता येत नाही. त्यामुळं विशेष काळजी घ्यावी लागते. तसंच लहान मुलाला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मल्टी विटामिन देत आहोत असही त्या म्हणाल्या.

परिचारिका केताली जांबुवडेकर सांगतात

लग्नानंतर घरी वृद्ध सासू आहे, आई-वडिल आहेत त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. कर्तव्यावर असताना गरोदर माता तसंच प्रसुती झालेल्या माता यांची विशेष काळजी घ्यावी लागते आहे. त्यांचे मानसिक स्वास्थ सांभाळणं महत्त्वाचं आहे. तसंच कर्करोगग्रस्तांची कशी काळजी घ्यावी हे देखील मोठं आव्हानं आहे.

हेही वाचा -आरपीएफ जवानाची सतर्कता; धावत्या रेल्वेतून फलाटाच्या गॅपमध्ये जाणाऱ्या महिलेचे वाचविले प्राण

ABOUT THE AUTHOR

...view details