महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Corona : घाबरू नका! फक्त 14 टक्केच लोकं रूग्णालयात; तर 0.32 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर -टोपे - आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांचा (Status of Maharashtra including Mumbai) मृत्यूदर १.६१ टक्के इतका होता. ऑक्टोबरमध्ये १.७८ टक्के, नोव्हेंबरमध्ये १.७३ टक्के आणि डिसेंबरमध्ये ०.५० टक्के इतका होता. (Status Of Maharashtra Corona Outbreak) जानेवारीत आजपर्यंत हा मृत्यूचा आकडा ०.०३ टक्के इतका आहे अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

Status Of Maharashtra
Status Of Maharashtra

By

Published : Jan 13, 2022, 12:12 PM IST

Updated : Jan 13, 2022, 12:36 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात करोना रूग्णांची संख्या वाढत असली तरी त्यामुळे घाबरून न जाण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना केले आहे. (Maharashtra Corona Situation) या वाढणाऱ्या रूग्णांच्या संख्येत ८६ टक्के रूग्ण सौम्य लक्षणे असणारी आहेत. तसेच हे सर्व रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. (Status of Maharashtra including Mumbai) यामधील उर्वरित १४ टक्के रुग्णांमध्येही केवळ २.८ टक्के रूग्ण गंभीर वर्गवारीत येतात. अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. (Health Minister Rajesh Tope) यावेळी त्यांनी राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर देत असून केंद्राकडे अधिक लसींची मागणी करणार असल्याचेही टोपे यांनी सागंगितले आहे.

ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर ०.५९ टक्के

सध्या महाराष्ट्रात सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या २ लाख ४५ हजारांच्या दरम्यान आहे. त्यात दिलसादायक परिस्थिती आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. (Number of active corona patients in Maharashtra) जरी रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यातला जमेचा भाग म्हणजे ८६ टक्के लोक गृहविलगीकरणात आहेत. त्यांना सर्दी-खोकला एवढाच त्रास आहे. उर्वरित १४ टक्के जे रूग्णालयात आहेत त्यातील आयसीयूत ०.९ टक्के रूग्ण आहेत. व्हेंटिलेटरवर ०.३२ टक्के, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर ०.५९ टक्के, केवळ ऑक्सिजन बेड असलेल्या ठिकाणी १.८९ टक्के रूग्ण आहेत. म्हणजेच एकंदर २.८ टक्के रूग्ण गंभीर वर्गवारीत आहेत अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.

जानेवारीत आजपर्यंत हा मृत्यूचा आकडा ०.०३ टक्के

राज्यात सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर (Mortality rate of corona patients in Maharashtra) १.६१ टक्के इतका होता. ऑक्टोबरमध्ये १.७८ टक्के, नोव्हेंबरमध्ये १.७३ टक्के आणि डिसेंबरमध्ये ०.५० टक्के इतका होता. जानेवारीत आजपर्यंत हा मृत्यूचा आकडा ०.०३ टक्के इतका आहे. असे राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

लोकही स्वतः चाचणी करून घेत आहेत

राज्याची आरटीपीसीआर चाचणी करण्याची दररोजची क्षमता २ लाख इतकी आहे. आपण त्या सर्व २ लाख चाचण्या करत आहोत. याशिवाय सर्व जिल्हाधिकाऱ्यांना रॅपिड अँटिजन टेस्ट (RAT) करण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत असही ते म्हणाले आहेत. तसेच, लोकही स्वतः चाचणी करून घेत आहेत असेही टोपे यांनी सांगितले आहे.

सध्या केवळ साडेसहा लाख लोकांचेच लसीकरण

याचबरोबर लसीकरणाचा दर कमी झाला आहे. आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. मात्र, सध्या केवळ साडेसहा लाख लोकांचेच लसीकरण होत आहे. एकेकाळी राज्यात दररोज ८-१० लाख लसीकरण होत होते. ते चित्र कमी झाले आहे. त्याला गती प्राप्त झाली पाहिजे म्हणून प्रशासनाला सूचना केल्या आहेत असही ते म्हणाले आहेत.

पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ९० टक्के

सध्या राज्यात लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ९० टक्के इतके झाले आहे. यामध्ये दोन डोस घेतलेल्या लोकांचे प्रमाण ६२ टक्के आहे. मात्र, आपण देशाच्या सरासरीच्या थोडे मागे आहोत. त्यामुळे ते योग्य नाही. त्यामुळे आपण या दृष्टीने पुढे गेले पाहिजे. याबाबत आम्ही केंद्राकडे लसींची संख्या वाढवून मागितली आहे, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली आहे.

हेही वाचा -फाळणीचा नरसंहार! दोन सख्खे भाऊ भेटले 74 वर्षांनी;भेटून आश्रूंचा बांध फुटला

Last Updated : Jan 13, 2022, 12:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details