मुंबई -शिवसेना नक्की कोणाची, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची? की बंडखोर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांची? यावरून मागील काही दिवसांपासून चर्चांना उधाण आल असतानाच, अखेर काल विधिमंडळ सचिवालयाने पत्र काढून एकनाथ शिंदे यांचे गटनेतेपद कायम ठेवत अजय चौधरी यांचे गटनेते पद रद्द केले आहे. त्याचबरोबर भरत गोगावले यांचे प्रतोद पद कायम ठेवत सुनील प्रभू यांचे प्रतोद पद रद्द करण्यात आले आहे. हा शिवसेनेसाठी विशेष करून, उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) कुटुंबीयांसाठी फार मोठा झटका असून आता ही लढाई न्यायालयात लढली जाणार आहे.
सचिवालयाला अधिकार नाही? -विधिमंडळ सचिवांच्या या निर्णयानंतर बोलताना उद्धव ठाकरे गटाचे गटनेते अजय चौधरी यांनी सांगितले आहे की, विधिमंडळ सचिवालयाला गटनेते पद रद्द करण्याचा अधिकार नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात याबाबत कायदेशीर लढाई लढणार अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी यावेळी दिली आहे.