मुंबई -पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. केंद्र सरकार याकडे लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ युवासेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. हेच का अच्छे दिन, असा प्रश्न उपस्थित करत युवासेनेमार्फत येत्या रविवारी (ता.३१) राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. राज्यात या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटणार आहेत.
राज्यव्यापी आंदोलन -
देशात वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल-डीझेलचे दर गगनाला भिडले आहेत. 'बहोत हो गयी महंगाई की मार', अशी घोषणा देऊन भाजपा केंद्रात सत्तेवर आले. सध्या अवास्तव दरवाढ सुरू आहे. केंद्र सरकारला जागे करण्यासाठी युवासेना आक्रमक झाली आहे. येत्या रविवारी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. सकाळी दहा वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात होईल. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार असून यावेळी सायकल रॅलीही काढली जाणार आहे.