मुंबई -महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने राज्याचे माजी गृह निर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यासह तीन पोलीस कर्मचाऱ्यांना देखील ही नोटीस पाठवण्यात आली आहे. 2020 साली ठाण्यात सिविल इंजिनियर अनंत करमुसे यांना जितेंद्र आव्हाड ( NCP leader Jitendra Awhad ) यांनी त्यांच्या ठाण्याचा घरी नेऊन अमानुष मारहाण केली असल्याचा आरोप अनंत करमुसे यांनी केला होता. याबाबत अपहरण आणि अमानुष मारहाण केल्याबद्दलची तक्रार नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली होती. त्यावेळी जितेंद्र आव्हाड हे महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहनिर्माण मंत्री देखील होते.
ऑक्टोबर 2021 मध्ये जितेंद्र आव्हाड येणार पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच त्यांना न्यायालयाकडून जामीन नाही मिळाला होता. या सर्व प्रकरणाचा तपास सीबीआय करून करण्यात यावा, अशी मागणी पीडित तरुणीने केली होती. मात्र न्यायालयाने त्यांची ही मागणी भेटली होती. मात्र आता या प्रकरणात राज्य मानवाधिकार आयोगाने जितेंद्र आव्हाड यांना नोटीस बजावली आहे. त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.