महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सीबीआय चौकशी होईपर्यंत राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा - देवेंद्र फडणवीस - devendra fadnavis on home minister anil deshmukh

मुंबई पोलिसांवर दबाव लक्षात घेता उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. आत्ता चौकशी होईपर्यंत राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यातील हप्तेखोरीला व उच्च न्यायालयाने आळा घातला आहे, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.

devendra fadnavis on home minister anil deshmukh
देवेंद्र फडणवीस

By

Published : Apr 5, 2021, 5:00 PM IST

मुंबई - मुंबई पोलिसांवर दबाव लक्षात घेता उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. आत्ता चौकशी होईपर्यंत राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यातील हप्तेखोरीला व उच्च न्यायालयाने आळा घातला आहे, असे देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.


परमबीर सिंग यांच्या आरोपानंतर गृहमंत्र्यांची चौकशी सीबीआयने करू नये यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. आत्ता या प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत होणार हे स्पष्ट झाले आहे तोपर्यंत गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व ते या चौकशीत निर्दोष सापडले तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यात यावे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देणे ही काय राजकीय मागणी राहिली नाही. देशमुख यांनी नैतिकतेच्या आधारावर तात्काळ आपला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा ते राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. उच्च न्यायालयाने देखील या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याच आम्ही स्वागत करतो. या आदेशामुळे आत्ता हप्ते वसुलीचा पर्दाफाश होईल. राज्याला काळिमा फासणारा हा जो कारभार मधल्या काळात झाला त्याची सत्यता सीबीआयच्या चौकशीतून बाहेर येईल, असे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.


अनिल देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पवार हे मोठे नेते आहेत. मोठ्या नेत्यांनी नैतिकता पाळणे हे संकेत आहेत. आतापर्यंत राजीनाम्याची मागणी केली आम्ही केली होती पण कोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा या पवार साहेबांकडे आहेत तेच या विषयावर निर्णय घेतील पवार साहेब आजारी आहेत त्यामुळे आम्ही त्यांना त्रास देत नाही.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा मान राखला पाहिजे. ते ज्या घराण्यातून येतात त्यांचा मान राखत त्यांनी देशमुख यांचा राजीनामा घेतला पाहिजे. त्यांनी राजीनामा घेतला नाही तर लोक मुख्यमंत्र्यांकडे संशयाच्या नजरेने पाहतील, असे देखील देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत बोलले.

ABOUT THE AUTHOR

...view details