महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

​​Shambhuraj Desai : 'पोलिस दलाच्या बळकटीकरणावर भर' - गृह राज्यमंत्री शंभूराजे देसाई - विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर

कोरोना काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पोलिस दलाने अत्यंत चांगले काम केले आहे. पोलिस दलावरील मानसिक व शारीरिक ताण कमी करण्यासाठी महिलांना आठ तास ड्युटी केल्याचे शंभूराजे देसाई ​​( Shambhuraj Desai on Police Force ) यांनी सभागृहात सांगितले.

shambhuraje desai
shambhuraje desai

By

Published : Mar 14, 2022, 7:00 PM IST

Updated : Mar 14, 2022, 8:55 PM IST

मुंबई - राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास शासन कट्टीबध्द आहे. तसेच ज्यांच्या हातात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी त्या पोलिस दलाच्या बळकटीकरणावर भर देणार असल्याची ग्वाही गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली. विधानपरिषदेत नियम २६० अन्वये मांडण्यात आलेल्या कायदा व सुव्यवस्था विषयक प्रस्तावावर उत्तर देताना देसाई बोलत होते. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, सदस्य गोपीचंद पडळकर, निरंजन डावखरे, प्रवीण दटके यांनी सहभाग घेतला होता.

राज्यातील आरोग्य यंत्रणेबरोबरच पोलिस दलावर कोरोनाच्या काळात कामाचा ताण पहायला मिळाला. कोरोनामुळे पोलिस दलातील अनेक अधिकारी व कर्मचारी बाधित झाले. कोरोना काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पोलिस दलाने अत्यंत चांगले काम केले आहे. पोलिस दलावरील मानसिक व शारीरिक ताण कमी करण्यासाठी महिलांना आठ तास ड्युटी केल्याचे शंभूराजे देसाई यांनी सभागृहात सांगितले.

कर्मचाऱ्यांना चांगली घरे देणार
पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगली घरे उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस आहे. त्याचाच एक भाग म्हणजे २०१९-२०२० मध्ये पोलिस दलाला घरकुलासाठी २५० कोटी रुपये उपलब्ध करून दिले. २०२० -२१ मध्ये ४०० कोटी रुपये, २०२१-२०२२ मध्ये ८०० कोटी तर २२-२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पोलिसांसाठीच्या घरांसाठीची तरतूद एक हजार कोटी रुपये प्रस्तावित आहे. तसेच पोलिस दलास चांगल्या दर्जाची दुचाकी व चारचाकी वाहने उपलब्ध करून दिल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.

पेपरफुटीप्रकरणी गुन्हा
आरोग्य, म्हाडा, शिक्षण विभागातील पेपरफुटीप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणांचा पुढील तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे देसाई यांनी सांगितले. तसेच पोलिस दलात भरती प्रक्रिया सु​​रू केली असून १२ हजार ५०० पदे भरण्यास मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यापैकी ७२३१ पदांसाठीची भरती प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले.

हेही वाचा -MBBS Paper Leaked in Latur : एमबीबीएसचा पेपर लातुरात फुटला, आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर

Last Updated : Mar 14, 2022, 8:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details