महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा - भाजपचे नेते किरीट सोमैया - State Health Minister Rajesh Tope

नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे 23 रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच, विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील सगळ्या हॉस्पिटलचे फायर ऑडिट त्वरित करा व राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपला राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी केली आहे.

भाजपचे नेते किरीट सोमैय्या
भाजपचे नेते किरीट सोमैय्या

By

Published : Apr 23, 2021, 9:19 AM IST

Updated : Apr 23, 2021, 9:54 AM IST

मुंबई- नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे 23 रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच, विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली होती. यामध्ये १३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी अतिदक्षता विभागात १७ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे. दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले व इतर रुग्णांची सुटका करण्यात आली. तर ५ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

'राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपला राजीनामा द्यावा'

विरार मधील हॉस्पिटलला आग लागून मृत्यू झालेल्या प्रकरणासंदर्भात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, राज्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा तांडव सुरू आहे. राज्याने केंद्राकडे त्वरित मदत मागून आर्मीच्या मदतीने प्रत्येक हॉस्पिटलमधील फायर ऑडिट आणि ऑक्सिजन ऑडिट केलं पाहिजे. राज्य सरकारला आपली जबाबदारी समजली पाहिजे. ह्या सगळ्याला जबाबदार असणारे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आपला राजीनामा द्यावा अशी मागणी या वेळेस भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

नेमकी घटना कशी घडली?

विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात रात्री ३ वाजल्याच्या सुमारास ही आग लागली होती. AC चा स्फोट होऊन आग लागली होती. ही आग इतकी भीषण होती की, यात अतिदक्षा विभागातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी दिली. सध्या अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले असून रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलविण्याचे काम सुरू आहे.

महानगरपालिकेचे आयुक्त घटनास्थळी अनुपस्थित

दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडल्या नंतर वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त घटनास्थळी उपस्थित नव्हते. केवळ स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीच इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले. मृतांमध्ये पाच महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे.

हेही वाचा -LIVE Updates : विरारमधील रुग्णालयाच्या आयसीयू विभागात आग; १३ रुग्ण दगावले..

Last Updated : Apr 23, 2021, 9:54 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details