मुंबई -साखर आणि उसाप्रमाणे दुधाला आधारभूत किंमत मिळवून ( Committee For Milk FRP ) देण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन केली जाईल, अशी घोषणा दुग्ध विकासमंत्री सुनील केदार यांनी ( Sunil Kedar On Milk FRP ) विधान परिषदेत केली आहे. ताराकिंत प्रश्नाच्या तासाला राज्यातील सर्व दूध उत्पादकांना किमान आधारभूत किंमत (एफआरपी) मिळावी, अशी मागणी विक्रम काळे यांनी केली होती. मंत्री केदार यांनी यावर स्पष्टीकरण देताना ही माहिती दिली.
काय म्हणाले सुनील केदार -
राज्यातील दुग्ध व्यवसायापैकी ६० टक्के दूग्ध व्यवसाय खासगी, ३५ टक्के सहकार क्षेत्राकडे तर उर्वरित केवळ ५ टक्के दूग्ध व्यवसाय शेतकरी करतात. त्यामुळे सरसकट सर्वांना एफआरपी देण्यासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन केली जाईल. ही उपसमिती एफआरपीबाबत निर्णय घेईल, असे केदार यांनी सांगितले. तसेच दूध उत्पादकांनी कोरोना काळात सरकारला उत्तम साथ दिली. दुधाला चांगला भाव देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्याच बरोबरच दुधाच्या प्रक्रिया उद्योगाला चालना दिली जाईल. कोरोनाच्या काळात अतिरिक्त दुधाची भुकटी करण्यात आली. अशा प्रकारे दुधावरील विविध प्रक्रिया उद्योग राबवण्यासाठी दूध उत्पादकांना मदत करणार असल्याचे असे केदार यांनी सांगितले.
हेही वाचा -Sanjay Raut Criticized : 'ते कधीपासून हिंदू झाले हे तपासावे लागेल; संजय राऊतांचा भाजप-मनसेवर निशाणा