मुंबई -देशाच्या आर्थिक राजधानीचे फुफ्फुस अशी ओळख असलेले आरेचे जंगल वृक्ष तोडीमुळे पुन्हा चर्चेत येणार आहे. राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार आरेतील वरळी परिसरातील तब्बल दहा एकर जमीन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन केंद्रासाठी हस्तांतरित करण्यात येणार आहे.
काय आहे या शासन निर्णयात ?
राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार आरेतील वरळी परिसरातील तब्बल दहा एकर जमीन आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन केंद्रासाठी हस्तांतरित ( International standard tourist center ) करण्यात येणार आहे. त्यामुळे आरे महाव्यवस्थापक ( Aarey General Manager office ) यांचे कार्यालय व दुग्ध शाळा गोरेगाव येथील आरे कॉलनीत ( Aarey colony Mumbai ) स्थलांतरित करण्यात येणार आहे.
हेही वाचा-Action Against Nana Patole : नाना पटोले यांच्यावर कारवाई केली जाईल - गृहमंत्री पाटील यांचे आश्वासन!
महाविकास आघाडीने केली होती घोषणा
आरे कॉलनीत पर्यटन केंद्र हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. वरळी येथील आरेच्या भूखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र व मत्स्यालय उभारण्यात येणार असल्याची घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती. वरळीतील या जागेचा ताबा महसूल विभागाकडून नगरविकास विभागाला हस्तांतरित केल्यानंतर आरे महाव्यवस्थापकांचे कार्यालय व दुग्धशाळा गोरेगावच्या आरे कॉलनीत स्थलांतरित करण्यात येणार आहे.