मुंबई -औषधांची विक्री वाढावी, यासाठी अनेकांना जाहिरातीतून प्रलोभन दाखवली जातात. राज्याच्या औषध व अन्न प्रशासनाने अशाच प्रकारची जाहिरात दाखवणाऱ्या एक कंपनीवर आज कारवाई केली. दरम्यान, त्यांच्याकडून सुमारे ४८ लाखांचा साठा जप्त केल्याची माहिती राज्य शासनाने दिली.
४८ लाखांचा माल जप्त -
मायफेअर क्रिमचे उत्पादक झी लॅबोरटरीज लि., पोआंटा साहिब, हिमाचल प्रदेश या औषधांच्या लेबलवर अविश्वसनीय सौंदर्यता व त्यामध्ये असलेल्या माहिती पत्रकात 'त्वचेचा रंग उजाळते' अशा प्रकारचे आक्षेपार्ह मजकूर छापण्यात आले होते. याप्रकरणी राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने भिवंडी आणि नागपूरमध्ये धाडी काढल्या. भिवंडी येथील गोडाऊन मधून १४ लाखांचा व नागपूर येथून ३४ लाखांचा साठा जप्त केल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त व औषध नियंत्रण प्राधिकारी दा. रा. गहाणे यांनी दिली.