महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यातील कुचकामी सरकार कसे लवकर जाईल यासाठी कामाला लागा; नारायण राणेंचे भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन - BJP Jan Ashirwad Yatra in mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने केलेली कामे आणि लागू केलेल्या योजना नागरिकापर्यंत पोहचवण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा काढल्या जात आहेत. केंद्रीय मंत्री झालेले नारायण राणे पहिल्यांदाच मुंबईत आले आहेत. त्यांनी मुंबई ते कोकण अशी जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. या यात्रेदरम्यान त्यांनी घाटकोपर येथील भाजपा कार्यकर्ते आणि नागरिकांना संबोधित केले.

union minister narayan rane
राज्यातील कुचकामी सरकार कसे लवकर जाईल यासाठी कामाला लागा

By

Published : Aug 20, 2021, 6:15 PM IST

मुंबई - महाराष्ट्र हे देशात प्रगत असे राज्य आहे. मात्र, राज्यात कुचकामी सरकार असल्याने गेल्या दोन वर्षात राज्य अधोगतिकडे चालले आहे. यासाठी राज्यातील कुचकामी सरकार कसे जाईल यासाठी कामाला लागा अशा सूचना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजपा कार्यकर्त्यांना केल्या. तसेच मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवण्यासाठी महापालिका निवडणुकीत भाजपाला भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन राणे यांनी मुंबईकरांना केले.

'राज्यातील सरकार कुचकामी'
  • 'कुचकामी सरकार'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने केलेली कामे आणि लागू केलेल्या योजना नागरिकापर्यंत पोहचवण्यासाठी जन आशीर्वाद यात्रा काढल्या जात आहेत. केंद्रीय मंत्री झालेले नारायण राणे पहिल्यांदाच मुंबईत आले आहेत. त्यांनी मुंबई ते कोकण अशी जन आशीर्वाद यात्रा काढली आहे. या यात्रेदरम्यान त्यांनी घाटकोपर येथील भाजपा कार्यकर्ते आणि नागरिकांना संबोधित केले. यावेळी बोलताना देशात महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. मात्र गेल्या दोन वर्षात हे राज्य अधोगतिकडे चालले आहे. याला जे पदावर बसले आहेत ते जबाबदार आहेत. ते पदावर आहेत याची जाणीव होत नसल्याचा टोला राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता लगावला आहे. हे सरकार कुचकामी सरकार आहे, लोकांना अधोगतिकडे नेणारे सरकार आहे, हे लोकांना घराघरात जाऊन सांगा, हे सरकार लवकर कसे जाईल यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन राणे यांनी कार्यकर्त्यांना केले.

  • 'भाजपच्या हाती सत्ता द्या'

मुंबई पालिकेची निवडणूक पुढील वर्षी होत आहे. ३२ वर्ष पालिकेची सत्ता शिवसेनेकडे आहे. या कालावधीत यांना मुंबईला चांगले शहर बनवता आलेले नाही. जगभरात कोरोना पसरला आणि आटोक्यात आला. मुंबई आणि राज्यात मात्र कोरोनामुळे लाखो मृत्यू झाले. या कोरोना काळात नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देता आल्या नाहीत. जगभरात अनेक शहर पर्यटनदृष्ट्या नावारूपाला आली आहे. मात्र, मुंबईसारखे जागतिक दर्जाचे शहर यांना पर्यटनदृष्ट्या विकसित करता आलेलं नाही. मुंबई सर्वात सुंदर आणि सुरक्षित शहर आहे अशी लोकांनी स्तुती करावी असे शहर आहे. पण हे आताचे सरकार करू शकत नाही. तशी क्षमता या सरकारमध्ये नाही. ही क्षमता फक्त भाजपाकडे असल्याने महापालिकेच्या निवडणुकीत भरघोस मतांनी निवडून द्या असे आवाहन राणे यांनी मुंबईकरांना केले.

हेही वाचा - भाजपावर टीका करणे हा शिवसेनेचा एक कलमी कार्यक्रम - रावसाहेब दानवे

ABOUT THE AUTHOR

...view details