मुंबई - ठाणे जिल्ह्यातील चौदा गावे ( 14 Villages In Thane District ) आजपासून नवी मुंबईत समाविष्ट करण्याची घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Urban Development Minister Eknath Shinde ) यांनी आज ( 14 Villages Merged In Navi Mumbai ) केली. दहिसर, निगु, मोकाशी पाडा, नावळी, भांडर्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बांबली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळन, बाळे आणि दहिसर मोरी ही १४ नवी मुंबई महानगरपालिकामध्ये ( Navi Mumbai Municipal Corporation ) समाविष्ट करण्यात आली आहेत. गेल्या सात ते आठ वर्षापासून या गावांना नवी मुंबई महानगरपालिकामध्ये समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात होती. मात्र माझ्याकडे दोन वर्षापासून नगरविकास खातं आल्यानंतर याबाबत आपण सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याला आज यश आलं, अशी भावना एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केली. ही चौदा गाव नवी मुंबई महानगरपालिकामध्ये समाविष्ट झाल्यामुळे मूलभूत सुविधा महानगरपालिकेकडून पुरवल्या जातील, असंही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
राजकीय वापरासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर :महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर आणि नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेच्या धाडी सातत्याने पडत आहेत. केवळ राजकीय वापरासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला जात असून, सूडबुद्धीने या कारवाया सुरू आहेत. कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीची चौकशी करण्यात काही गैर नाही. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत केवळ केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर होत असल्याच दिसत असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली.