महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

परमबीर सिंह संदर्भातील 'ते' आश्वासन आता पाळता येणार नाही, राज्य सरकारची न्यायालयात भूमिका - Parambir Singh government position etvbharat

मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारने आज परमबीर सिंह यांच्यावरच्या कारवाईसंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने परमबीर सिंह यांच्यावर कारवाई न करण्याचे आश्वासन आता पाळले जाण्याची शाश्वती देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Parambir Singh government position etvbharat
राज्य सरकारने परमबीर सिंह कारवाई आश्वासन

By

Published : Oct 20, 2021, 7:35 PM IST

Updated : Oct 20, 2021, 7:54 PM IST

मुंबई -मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारने आज परमबीर सिंह यांच्यावरच्या कारवाईसंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे. यासंदर्भात राज्य सरकारने परमबीर सिंह यांच्यावर कारवाई न करण्याचे आश्वासन आता पाळले जाण्याची शाश्वती देता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा -मुंबई क्राईम ब्रांचकडून सेक्स टूरिझम रॅकेटचा भंडाफोड; दोन महिला अटेकत

परमबीर सिंह नेमके कुठे आहेत, त्यांचा ठावठिकाणा अद्याप समजलेला नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान आज राज्य सरकारने परमबीर सिंह यांच्यावरच्या कारवाईसंदर्भात भूमिका स्पष्ट केली. परमबीर सिंह याच्यावर कारवाई न करण्याचे आश्वासन आता पाळले जाण्याची शाश्वती देता येणार नाही, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे, त्यामुळे परमबीर सिंह यांच्यावर कारवाई करण्याची तयारी राज्य सरकारने पूर्ण केल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.

परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या आरोपांनंतर या प्रकरणावर मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांच्यावर देखील अनेक आरोप झालेत. त्यांच्यावर अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यासंदर्भात सुनावणी सुरू आहे. मात्र, परमबीर सिंह यांच्याविरोधात समन्स बजावून देखील ते अद्याप समोर आलेले नसल्याने परमबीर सिंह बेपत्ता असल्याचा निष्कर्ष राज्य सरकारने न्यायालयासमोर मांडला आहे.

परमबीर सिंह नेमके कुठे आहेत, याविषयी अद्याप कोणतीही माहिती नाही. त्यामुळे, त्यांच्यावर कारवाई न करण्याचे दिलेले आश्वासन राज्य सरकारला पाळता येणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने मांडली आहे. मात्र, परमबीर सिंह यांची बाजू कोर्टासमोर मांडणारे वकील महेश जेठमलानी यांनी त्यांना अजून फरार घोषित करण्यात आलेले नाही, असे यावेळी सांगितले.

हेही वाचा -Cruise Drug Case : जामिनासाठी आर्यन खानची मुंबई उच्च न्यायालयात धाव; उद्या होणार सुनावणी

Last Updated : Oct 20, 2021, 7:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details