ठाणे - मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी एटीएसला दिलेल्या तक्रारीमध्ये धक्कादायक खुलासा केला असून अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेली स्कॉर्पियो गाडी ही सचिन वझे चार महिन्यांपासून वापरत असल्याचे म्हटले आहे. वझे व धनजंय गावडे यांचा संपर्क मनसुख यांच्याशी होता. सचिन वझे यांनी माझ्या पतीला तू या जिलेटिन प्रकरणात अटक हो, मी तुला लवकरच जामीनावर बाहेर काढेन, असे सांगितल्याचे हिरेन यांच्या पत्नीने एफआयआरमध्ये म्हटले आहे. त्यासोबत माझ्या पतीचा खून झाला असून तो सचिन वझे यांनी केला असावा, अशी शंका व्यक्त करण्यात आली आहे.
मोहन डेलकर आणि मनसुख हिरेन प्रकरणावरून विरोधक-सत्ताधारी वेलमध्ये आमने-सामने दिसले. वेलमध्ये उतरत दोन्ही बाजूच्या आमदारांनी समोरासमोर येत एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे आधी 10 मिनिटे आणि नंतर अर्धा तास विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.
सचिन वझे यांना अटक करा - फडणवीस
हे ही वाचा - पालघर जिल्हापरिषदेतील १५ तर जिल्ह्यातील चार पंचायत समितीतील १४ सदस्यांची पदे रद्द
सचिन वझे यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. वझेंना तातडीने निलंबित केले पाहिजे. त्यांना पुरावे नष्ट करण्याची मुभा तुम्ही देत आहात. केवळ एका पक्षात प्रवेश केला म्हणून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. सचिन वझेंना आधी निलंबित करा. वझेंना पुन्हा कसे नियुक्त करून घेतले. एवढे पुरावे देऊनही तुम्ही त्यांना पाठिशी घालत असाल तर मला तुमच्यावरच शंका येते. फडणवीसांचा थेट गृहमंत्र्यांवर हल्ला.
अनिल देशमुखांचे सभागृहात निवेदन -
22 फेब्रुवारीला मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली. ते सात वेळा खासदार होते. त्यांनी सुसाईट नोट लिहिली आहे. त्यात प्रशासक प्रफुल खेडा पटेल यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यांना वारंवार त्रास दिला जात होता. सामाजिक जीवन उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रफुल्ल पटेल हे प्रसारक आहेत आधी ते गुजरातमध्ये गृहमंत्री होते.
हे ही वाचा - मुंबई-नाशिक महामार्गावरील प्लास्टिक कारखान्याला भीषण आग
त्यांनी सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे, की मी मुंबईत आत्महत्या करत आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार आणि महाराष्ट्र शासन यांच्यावर माझा विश्वास आहे. मला न्याय महाराष्ट्रात मिळेल असा उल्लेख केला आहे. पत्नी कालबेन डेलकर आणि चिरंजीव अभिनव डेलकर यांनी देखील मला पत्र लिहिलं असून त्यांनी ही प्रफुल पटेल यांच्यावर आरोप केले आहेत. मोहन डेलकर यांना महाराष्ट्रात येऊन आत्महत्या केली. या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत केली जात आहे. मध्यप्रदेशचे आयएसआय अधिकारी राजेश कुमार श्रीवास्तव यांनी नागपूरमध्ये आत्महत्या केली त्यांचा देखील तोच उद्धेश असावा, असं माझं मत आहे. एटीएसकडून तपास केला जात आहे. निष्पक्ष तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन देशमुख यांनी दिले.