मुंबई - कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात असून महाविकास आघाडी सरकारने मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे सरकारच्या लसीकरण मोहिमेला मदत म्हणून अनेक नामांकित कंपनी आणि दानशूर व्यक्ती समोर आल्या आहेत. डोर्फ केटल केमिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पुढाकार घेतला आहे. कंपनीने आपल्या सी.एस.आर. निधीतून ५० लाख रुपयांची देणगी महाराष्ट्र राज्य सरकारला दिली आहे.
'डॉर्फ केटल केमिकल्स' कडून लसीकरणासाठी राज्याला ५० लाखांचा निधी - CSR fund
कोरोनाविरोधात लढाई करण्यासाठी आपलाही हातभार लागावा, यासाठी डोर्फ केटल केमिकल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने पुढाकार घेतला आहे. कंपनीने आपल्या सी.एस.आर. (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीतून ५० लाख रुपयांची देणगी महाराष्ट्र राज्य सरकारला दिली आहे. सध्या कोरोनाविरोधात लसीकरण मोहीम सुरु आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून कंपनीने ५० लाख रुपये दिले आहेत.

वेगाने लसीकरण होऊन नागरिकांचे प्राण वाचले पाहिजेत, हा आमचा मुख्य हेतू असल्याचे सी.एस.आर.-हेड संतोष जगधने यांनी सांगितले . डॉर्फ केटल केमिकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना १९९२ यामध्ये झाली. कंपनीने सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधीतून आतापर्यंत अनेक समाजोपयोगी कार्ये केली आहेत. वंचित वर्गाचे सक्षमीकरण आणि समाज परिवर्तन करणे याबाबत कंपनी कार्य करत आहे. तळागाळातील लोकांपर्यंत कंपनी सीएसआरच्या माध्यमातून पोहोचत आहे. दरम्यान, लसीकरणासाठी ५० लाख रुपयांची निधी देऊन कंपनीने आदर्श निर्माण केला आहे.